Monday 20 May 2019

शेंद्रीय अन्नधान्य भाजीपाला विक्री स्टाँलचे भोकरदन येथे उद्घाटन


आज धावपळीच्या जीवनात सर्वत्र प्रदूषित वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. उत्तम आरोग्यासाठी सकस आहाराची अत्यंत आवश्यकता आहे. आहारात जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, कबरेदके यांचा योग्य प्रमाणात समावेश असायलाच हवा. धान्य, भाजीपाला, फळे, दूध हे आहाराचे अविभाज्य भाग आहेत, पण रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराने अन्नधान्य आणि भाजीपाल्यांमध्ये विषारी घटकांचे प्रमाण आढळून आले आहे. ते पोटात गेल्याने आजारांच्या विळख्यात सापडण्याची शक्यता बळावल्यामुळे विषमुक्त धान्य, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती, दूध आदी खाद्यपदार्थाच्या वापराकडे ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. ही मागणी लक्षात घेऊनच कृषी माहिती तंत्रज्ञान भोकरदन येथे ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र’ सुरू केले आहे. ग्राहकांना नैसर्गिक शेतमाल मिळत नाही. त्यांना वर्षभर या शेतमालाचा पुरवठा व्हावा, या हेतूनेच हे केंद्र आकाराला आले आहे.

भारतीय पारंपरिक नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाने उत्पादित मूळ नैसर्गिक गुणांनी समृद्ध व आरोग्यवर्धक सेंद्रीय शेतमाल या केंद्रात उपलब्ध आहे. यात सर्व प्रकारचा मोसमी भाजीपाला, संत्री, मोसंबी, लिंबू व इतर फळे, चिन्नोर, जय श्रीराम व हातकुटीचा तांदूळ, बन्सी, लोकवन गहू व पीठ, गावरान ज्वारी व पीठ, गावरान तुरीची डाळ, हरभरा डाळ व बेसन, धने, जिरे, हळद व तिखट, वायगाव हळद, भिवापुरी मिरची आदी मसाल्याचे पदार्थ, गूळ, शेंगदाणे, शेंगदाणे तेल, गिर गाइचे दुध इतर पदार्थ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या केंद्रातील सर्वच वस्तू मॉलच्या तुलनेत स्वस्त आहे.
भोकरदन येथील हे पहिलेच ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र’आहे. अशा उपक्रमाचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे अवाहन कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष ईश्वर वाघ यानी केले आहे
या स्टाँलचे उद्घाटन पंतजली जिल्हा योगप्रभारी बालु महाराज वाघ यांचे हस्ते करन्यात आले यावेळी कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे सचिव भागवत गावंडे शेंद्रीय शेती प्रचारक अरुन बडनरे योग शिक्षक भगवान पालकर,कमलाकर इंगळे, जि.प.सदस्य केशव पा.जंजाळ ,खालेद पठान,गणेश मोरे,उत्तम पांडव,सोमीनाथ जंजाळ अनेक मान्यवर उपस्थित होते