Showing posts with label Events. Show all posts
Showing posts with label Events. Show all posts

Friday 7 August 2020

कोळेगाव येथील बैल पाडवा व यात्रा कार्यक्रम रद्द

 

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे दरवर्षी श्री भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव पोळा पाडवा सण उत्साहात साजरा करण्यात येतो. सध्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता श्री भैरवनाथ महाराज जागृत संस्थान व ग्रामपंचायत कार्यालय कोळेगाव यांच्या वतीने यावर्षी दि.19/08/2020 रोजी आयोजित होणारा कुस्त्या व यात्रा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. कोळेगाव येथील नागरिकांनी चालू स्थितीवर विचार मंथन करून कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता गर्दी टाळण्यासाठी भक्तांनी यावर्षी दर्शनासाठी येवू नये तसेच भैरवनाथ महाराज संस्थान परिसरामध्ये कोणीही प्रसादाचे, फराळाचे किंवा इतर दुकाने लावू नये असे आवाहन ग्रामपंचायत कार्यालय व श्री भैरवनाथ महाराज जागृत संस्थान कोळेगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Sunday 26 April 2020

कोळेगाव येथे आरोग्य अधिकारी कर्मचारी आशा वर्कर पुष्पगुच्छ उधळून स्वागत


जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी,कर्मचारी व आशा वर्कर यांचे कोळगाव येथील गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
पिंपळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व डॉक्टर,कर्मचारी हे जागरूकतेने काम करीत आहेत सोबतच या कोरोनाच्या लढाईत ते गावात जनजागृती करत आहेत त्यामुळे कोरोनाचे भय निघून गेले असून त्यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून गावकरी तशी काळजी घेत आहेत. सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून गावातील व्यवहार सुरळीत चालू  आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व कर्मचारी वर्गाने वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने गावकाऱ्यांना धीर मिळाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी निर्णय घेतला की रात्रंदिवस मेहेनत घेणाऱ्या या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचे पुष्पवृष्टीने स्वागत करावे. गावकरी देखील तुमच्या कार्यात तेव्हडीच साथ देणार हा आत्मविश्वास निर्माण व्हावा ही त्यामागची भूमिका. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येत सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळत प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राऊत,डॉ शिंदे,डॉ फदाट, ANM खेसर मॅडम,आशा वर्कर मनीषा सुरडकर अंगणवाडी सेविका या सर्वांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यावेळी जिल्हापरिषद केशव पाटील जंजाळ पंचायत समिती सदस्य सुदाम पाटील देठे, सरपंच गजानन पाटील गावंडे, माजी सरपंच पंडित पाटील, भैरवनाथ संस्थान अध्यक्ष सांडू साहेब गावंडे माजी सरपंच पुंडलिक पाटील गावंडे, माजी सरपंच तेजराव पाटील गावंडे, डॉ ईश्वर वाघ ग्रामपंचायत सदस्य नंदू पाटील सुसर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी गावकरी या कौतुक सोहळ्यात सामील झाले होते.
कोरोनाच्या या लढाईत 24 तास काम कारणाऱ्या डॉक्टर्स व अधिकारी कर्मचाऱ्यांना गावकरी साथ देतात व त्यांच्या सेवेचे कौतुक करतात हा पायंडा या गावाने पाडून दिला असून कोरोनाशी लढ्यासाठी आम्ही सर्व सोबत आहोत हे दाखवून दिले आहे.

Sunday 1 September 2019

कोळेगाव येथे बैलपाडव्या निमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे पोळा व बैल पाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोळेगाव येथे दरवर्षी पोळ्याच्या दुसऱ्या दिवसी बैल पाडव्याचे आयोजन केले जाते. पाडव्या निमित्त पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांसाहित भैरवनाथ महाराजांच्या मंदिरास प्रदक्षिणा घालून मोठ्या भक्तीभावाने दर्शन घेतले. जवळपास एक लक्ष भाविक भक्तांची आवक जावक असलेल्या या पाडव्यास गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानच्या वतीने यावेळी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
सोशल मिडीयाच्या काळात मैदानी खेळ लोप पावत आहेत आणि याच बाबीचे महत्त्व लक्षात घेऊन कोळेगाव येथील भैरवनाथ महाराज मंदिर परिसरामध्ये दरवर्षी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या भोंगा या चित्रपटातील कलाकार अविनाश कोलेते यांची या कुस्ती स्पर्धेस विशेष उपस्थिती होती. यावर्षी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ डॉ. ईश्वर वाघ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला. कोळेगाव पंचक्रोशीतील हौशी मल्लांनी मोठ्या प्रमाणात पाडव्यास हजेरी लावून कुस्त्यांच्या आनंद लुटला. ढगाळ हवामान व पावसाची रिप रिप असल्यामुळे कुस्ती स्पर्धेसाठी किती मल्ल येथील याबाबत साशंकता निर्माण झाली होती मात्र मल्लांची उपस्थिती आणि उत्साह वाखाणण्याजोगा होता. संस्थानच्या वतीने पुरविण्यात येत असलेल्या सोविसुविधामुळे दिवसेंदिवस भक्तांच्या संख्येत वाढ होत असून लवकरच शासनाकडे तीर्थक्षेत्राचे मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत भैरवनाथ महाराज संस्थांच्या अध्यक्षांनी व्यक्त केले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष श्री सांडू गावंडे, आर.डी. गावंडे, सखाराम सुसर, गजानन गावंडे, अनिल भाऊ गावंडे, पंडितराव गावंडे, पुंडलिकराव गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, सारंगधर सुसर, तेजराव गावंडे, रामू दादा, उत्तमराव गावंडे, रामचंद्र गावंडे, दादाराव गावंडे, साहेबराव महाराज, विठ्ठल महाराज, विष्णू ठुबे, नंदकिशोर सुसर, भागवत गावंडे, राजू सोन्नी, कमलाकर गावंडे, परमेश्वर गावंडे, एकनाथ सुसर, अंकुश गावंडे, रविंद्र गावंडे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. 
प्रतिक्रिया
खेड्यातील तरुणांच्या सुप्त गुणांना या स्पर्धेमुळे वाव मिळेल तरुणांनी मोबाईलवरील खेळापेक्षा मैदानी खेळाची कास धरावी, कोळेगावकरांचे मनापासून धन्यवाद” 

अविनाश कोलते (राष्ट्रीय पुरस्कार विजेता भोंगा चित्रपट कलाकार)

कुस्ती स्पर्धेमुळे तरुणांच्या मनांत मैदानी खेळाविषयी उत्सुकता निर्माण करणे यामुळे सोपे होईल ज्यामुळे त्यांची शारीरिक तंदरुस्ती वाढेल आणि कुस्ती खेळाविषयी प्रचार आणि प्रसार देखील सहजतेने होईल”
पंडितराव गावंडे (मा.सरपंच कोळेगाव)

“तरुणांच्या कला गुणांना वाव मिळावा त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोहत्सान मिळावे यासाठी दरवर्षी कोळेगाव यथे कुस्तीस्पर्धा भरविली जाते. याही पुढे अधिक चांगल्या पद्धतीने कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे”
डॉ. ईश्वर वाघ (प्रतिष्ठित गावकरी तथा सामाजिक कार्यकर्ता)

Monday 20 May 2019

शेंद्रीय अन्नधान्य भाजीपाला विक्री स्टाँलचे भोकरदन येथे उद्घाटन


आज धावपळीच्या जीवनात सर्वत्र प्रदूषित वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम आरोग्यावर होत आहे. उत्तम आरोग्यासाठी सकस आहाराची अत्यंत आवश्यकता आहे. आहारात जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, कबरेदके यांचा योग्य प्रमाणात समावेश असायलाच हवा. धान्य, भाजीपाला, फळे, दूध हे आहाराचे अविभाज्य भाग आहेत, पण रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापराने अन्नधान्य आणि भाजीपाल्यांमध्ये विषारी घटकांचे प्रमाण आढळून आले आहे. ते पोटात गेल्याने आजारांच्या विळख्यात सापडण्याची शक्यता बळावल्यामुळे विषमुक्त धान्य, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती, दूध आदी खाद्यपदार्थाच्या वापराकडे ग्राहकांचा कल वाढू लागला आहे. ही मागणी लक्षात घेऊनच कृषी माहिती तंत्रज्ञान भोकरदन येथे ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र’ सुरू केले आहे. ग्राहकांना नैसर्गिक शेतमाल मिळत नाही. त्यांना वर्षभर या शेतमालाचा पुरवठा व्हावा, या हेतूनेच हे केंद्र आकाराला आले आहे.

भारतीय पारंपरिक नैसर्गिक शेती तंत्रज्ञानाने उत्पादित मूळ नैसर्गिक गुणांनी समृद्ध व आरोग्यवर्धक सेंद्रीय शेतमाल या केंद्रात उपलब्ध आहे. यात सर्व प्रकारचा मोसमी भाजीपाला, संत्री, मोसंबी, लिंबू व इतर फळे, चिन्नोर, जय श्रीराम व हातकुटीचा तांदूळ, बन्सी, लोकवन गहू व पीठ, गावरान ज्वारी व पीठ, गावरान तुरीची डाळ, हरभरा डाळ व बेसन, धने, जिरे, हळद व तिखट, वायगाव हळद, भिवापुरी मिरची आदी मसाल्याचे पदार्थ, गूळ, शेंगदाणे, शेंगदाणे तेल, गिर गाइचे दुध इतर पदार्थ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या केंद्रातील सर्वच वस्तू मॉलच्या तुलनेत स्वस्त आहे.
भोकरदन येथील हे पहिलेच ‘शेतकरी ते ग्राहक थेट विक्री केंद्र’आहे. अशा उपक्रमाचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे अवाहन कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे अध्यक्ष ईश्वर वाघ यानी केले आहे
या स्टाँलचे उद्घाटन पंतजली जिल्हा योगप्रभारी बालु महाराज वाघ यांचे हस्ते करन्यात आले यावेळी कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राचे सचिव भागवत गावंडे शेंद्रीय शेती प्रचारक अरुन बडनरे योग शिक्षक भगवान पालकर,कमलाकर इंगळे, जि.प.सदस्य केशव पा.जंजाळ ,खालेद पठान,गणेश मोरे,उत्तम पांडव,सोमीनाथ जंजाळ अनेक मान्यवर उपस्थित होते

Friday 26 April 2019

ह.भ.प.साहेबराव महाराज गावंडे यांच्या कीर्तनाने श्रोतागण मंत्रमुग्ध



दिनांक २० एप्रिल २०१९ रोजी भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त अखंड हरीनाम सप्ताह व संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कोळेगाव येथील अखंड हरीनाम सप्ताहामध्ये दिनांक २४ एप्रिल २०१९ रोजी रात्री ठीक ८.३० वाजता ह.भ.प. साहेबराव महाराज गावंडे यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यसनधिनतेमुळे तरुणवर्गात मोठ्या प्रमाणात नैराश्य वाढीस लागत आहे आणि अशा नैराश्यग्रस्त तरुण पिढीच्या हातून देशसेवा घडणे अशक्यच आहे त्यामुळे तरुणांनी व्यसनधीनतेचा विषाप्रमाणे त्याग करावा असा उपदेश वजा विनंती यावेळी ह.भ.प. साहेबराव महाराज गावंडे यांनी तरुण वर्गास केली. व्यसनधीनतेबरोबरच इतर विविध सामाजिक मुद्द्यावर त्यांनी आपल्या कीर्तनातून यावेळी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. ह.भ.प. साहेबराव महाराज गावंडे यांनी आपल्या सुमधुर वाणीने आणि सोदाहरणासहित केलेल्या कीर्त्नामुळे श्रोतागण मंत्रमुग्ध झाले होते. आपल्या कीर्तनामुळे बोध घेऊन गावातील किमान दहा तरुणांनी जरी व्यसन सोडले तरी आपल्या कीर्तनाचे फलित झाले असे समजण्यास हरकत नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Wednesday 20 February 2019

शहिदांना अभिवादन करून कोळेगाव येथे शिवजयंती साजरी.


कोळेगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळीच गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. शालेय विध्यार्थ्यानी आपले लेझीमचे कसब दाखून शिवजयंतीचा आनंद द्विगुणित केला. कोळेगावच्या सरपंच सौ सरलाबाई गजानन गावंडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
तत्पूर्वी काश्मीर येथील पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोळेगाव येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. भारतीय सैनिकांवर झालेला हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे त्यामुळे पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा भारताने मुहतोड जवाब द्यावा अशी भावना यावेळी उपस्थित तरुणांनी व्यक्त केली. प्रत्येकाने आपल्या गावासाठी, राज्यासाठी पर्यायी देशासाठी होईल तेवढे योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

 गावातील नवतरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून त्यांचे विचार अंगीकारून प्रत्यक्ष कृती अमलात आणल्यास हेच खरे छत्रपतीं शिवाजी महाराजांना खरे अभिवादन ठरेल आणि शिवजयंती साजरी करण्याचे साफल्यही ठरेल असे मत यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केले.  कोळेगाव शिवजयंती उत्सव मंडळाने पुढील वर्षी एखादा सामाजिक उपक्रम राविल्यास अशा सामाजिक कार्यक्रमातून समाजात सकारात्मक संदेश जाईल असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले यावेळी गजानन गावंडे, पंडितराव गावंडे, पुंडलिकराव गावंडे, रामेश्वर गावंडे, नंदू सुसर, शालीकराव गावंडे, डॉ.ईश्वर वाघ, सांडू गावंडे, रामदास गावंडे, दादाराव गावंडे, चंदू गावंडे, भागवत गावंडे, संजय सुसर, गजानन गाढेकर, राजू गावंडे, रविंद्र गावंडे, योगेश गावंडे, शंकर गावंडे, नंदकिशोर गावंडे, नरेश कड, पवन गावंडे, नारायण वाघ, अवचीतराव सोनवणे, डी.जी.गावंडे आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

Friday 19 October 2018

पाण्याच्या प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याची कोळेगावकर वासियांनी घेतली शपत


वर्तमान पत्रातील दुष्काळ संबधित बातम्या वाचून मन खिन्न होत असतांना भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील गावकऱ्यांच्या उपक्रम एकूण नक्कीच सुखद धक्का बसेल यात शंका नाही. दुष्काळ आला म्हणून घाबरून न जाता पाण्याचा प्रत्येक थेंब अन थेंब जमिनीत जिरवून जिद्दीने व हिमतीने दुष्काळावर मात करण्याची शपत कोळेगावकर वासियांनी घेतली आहे आणि ही बाब इतर गावांसाठी देखील अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची गडद छाया पसरली असून पिण्याच्या पाण्यासाहित गुरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. अनियमित पडणारा पाऊस सतत वाढणारी महागाई आणि शेत मालाला मिळणारा कमी भाव यामध्ये शेतकऱ्याचे कंबरडे पार मोडून गेले आहे. यावर्षीची परिस्थिती तर अत्यंत विदारक बनत चालली आहे भविष्यातील भिषण पाणी टंचाईचे संकट ओळखून शेतकऱ्यांनी केवळ चारा व पाण्याच्या भीतीने गुरे विक्रीस काढली आहेत.
प्रत्येक गोष्टीसाठी सरकार अबलंबून राहिल्यास काहीच साध्य होणार नाही आता आपल्यालाही सरकारच्या बरोबरीने किंबहुना सरकारच्या दोन पावले पुढे चालावे लागेल तरच या भिषण दुष्काळाचा सामना करता येईल आणि हिच बाब अधोरेखित करून कोळेगाव येथील आजी माजी सरपंच, विरोधक सदस्य राजकीय जोडे बाहेर काढून हनुमान मंदिर सभागृहात एकत्र आले. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी दुष्काळ परिस्थितीवर उपाय योजना करण्यासाठी हनुमान मंदिर सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. गावातील नागरिकांची व महिलांची या सभेस मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हिवाळ्यातच उन्हाळ्याची चालूल लागली असल्यामुळे व पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पावसाळ्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, शोष खड्डे खोदुन पाणी जमिनीतचजिरविणे इत्यादी उपाय योजना करण्याचे गावकऱ्यांनी ठरविले. यावेळी सरपंच सौ. सरलाबाई गजानन गावंडे, मा.सरपंच पुंडलिकराव गावंडे, पंडितराव गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, तेजराव गावंडे, गजानन गावंडे, आर.डी.बाबा, सांडू साहेब, रामू दादा, विलासराव गावंडे, डी. पी. गावंडे, नंदू सुसर, शालीकराव गावंडे, मारोती गावंडे, समाधान गावंडे, पांडुरंग आप्पा वाघ. अंकुश गावंडे यांच्या सह नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Tuesday 11 September 2018

कोलेगावमें आयोजित कुश्ती स्पर्धा को पहिलवानोंओ का अच्छा प्रतिसाद



भोकरदन तहसील के कोलेगाव में हर साल की तरह इस साल भी बैल पडवा उत्साह के साथ मनाया गया. (कुश्ती का विडीयो देखने के लिए यहाँ क्लिक करें)पडवा के इस अवसर पर कुश्ती स्पर्धा का आयोजन किया गया था. गाव के ही प्रतिष्टित नागरिक श्री उत्तमराव गावंडे के हाथों नारियल फोड़कर कुश्ती स्पर्धा का शुभारंभ किया गया. गाव के नागरिकोंके सुनियोजन से भैरवनाथ महाराज संस्थान परिसर में कुश्ती का अखाडा निर्माण किया गया.कोलेगाव तथा कोलेगाव परिसर के पहिलवानोंओ इस कुश्ती स्पर्धा में बड़ी संख्या में सहभाग लिया. रेलगाव के जि.प.प्रा.शा. भैरवनाथवाडी स्कुल की विद्यार्थिनीओंने इस कुश्ती स्पर्धा में सहभागभाग लेकर बता दिया की अब कुश्ती केवल पुरुषोंका खेल नहीं है. शुभांगी मिसा, भाग्यश्री दौड, श्रावणी मिसाल इन स्कूली छात्राओंने इस कुश्ती स्पर्धा में बक्षिस के साथ साथ दर्शाकोंका मन भी जीता. सोशल मिडिया के आज के ज़माने में मैदान के खेल को युवा पीढ़ी भूलती जा रही है और ऐसें में कोलेगावमें वर्षोंसे चल रहे कुश्ती आखाड़े के परंपरासे निसंदेह गाव के पहिलवानोंओ को आपना हुनर दिखने का एवं मैदानी खेल के प्रति रुचाव बढानेका मौका मिल रहा है. मोबाईल गेम्स से जुढ़े युवाओं को कुश्ती के मैदान में आने को प्रेरित करने के लिए अगले साल और बढ़िया तरीकेसे कुश्ती स्पर्धा आयोजन करने का इरादा कोलेगाव के नागरिकोंने व्यक्त किया है. इस अवसर पर भैरवनाथ संस्थान अध्यक्ष सांडू गावंडे,उत्तमराव गावंडे, पुंडलिकराव गावंडे, शालीकराव गावंडे, पंडितराव गावंडे, तेजराव गावंडे, गजानन गावंडे, रामू दादा, समाधान गावंडे, सर्जेराव गावंडे, सुनील गावंडे, भागवत गावंडे, दादाराव गावंडे, दिलीप सुसर, रामधन सुसर, राजू सोन्नी, शिक्षक तथा मन्यवारोंकी उपस्थिथी थी.

Tuesday 6 March 2018

अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपले


कोळेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक श्री रामदास दगदुबा गावंडे यांचे वडील कै. दगडूबा मारोती गावंडे यांचे दिनांक ४ मार्च २०१८ रोजी रात्री ११:५० वाजता वयाच्या ११० व्या वर्षी निधन झाले. आजच्या धावपळीच्या काळात ८० वर्षे वयाचा टप्पा पार करणेही जिकरीचे झाले असतांना दगदुबा गावंडे यांनी ११० वर्षे जगलेले जीवन गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी विषय ठरत आहे. योग्य वेळी आहार, निर्व्यसनीपणा, सकारात्मक विचारदृष्टी व संकटकाळी धैर्याने परिस्थितीवर मात करणे यामुळे गाव व गाव परिसरामध्ये बाबांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यांनी समाजकारण, राजकारण व कलाक्षेत्रामध्ये एक वेगळी छबी निर्माण केली होती. त्यांच्या जाण्याने गावातील अष्टपैलू नेतृत्व हरपल्याचे मत, गावातील सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तथा प्रतिष्ठित नागरिकांनी व्यक्त केले आहे. बाबांचा समाजकारण आणि कलाक्षेत्राचा वारसा यापुढेही आम्ही निरंतर चालविण्याच्या प्रयत्न करू असे मत त्यांचे पुत्र रामदास गावंडे यांनी व्यक्त केला आहे, त्यांच्या पश्चात ५ मुले व २ मुली असा मोठा परिवार परिवार आहे.

Monday 19 February 2018

कोळेगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी (२०१८)


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते छत्रपतीशिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेतील छोट्या मुलांनी लेझीमची कला सादर करीत गावकऱ्यांची मने जिंकली.तरुणांनी नियोजनबद्ध पद्धतीने गावातून मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याजवळ मिरवणुकीची सांगता केली. गावातील युवकांनी आपापल्या परीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर यावेळी प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे प्रत्येक तरुणांसाठी सदैव प्रेरणादायी असून प्रत्येक तरुणांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेतल्यास एक चांगला समाज घडविण्यास मदत होऊ शकते आणि हीच बाब अधोरेखित करून कोळेगाव येथील तरुणांनी मागील काही वर्षांपासून शिवजयंती साजरी करण्यास सुरुवात केली असून त्यामध्ये दरवर्षी सुधारणा होत आहे आणि हि बाब नक्कीच अभिमानास्पद आहे. याप्रसंगी कोळेगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिकांसहित ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Monday 18 December 2017

'त्या' घटनेचा कोळेगाव येथे निषेध

रिसोड तालुक्यातील कुऱ्हा मांडवा येथे जखमी अवस्थेतील माकडाला जिवंत मारल्यानंतर त्याच्या मृतदेहास झाडावर लटकवून प्रातरणा करण्याऱ्या घटनेचा भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे तीव्र निषेध करण्यात आला. सामाजिक माध्यमावरील एका चित्रफितीमध्ये माकडाला जखमी करून अत्यंत निर्दयीपणे मारण्यात आल्याचे दिसत आहे. माकडाला मारणारा निर्दयी युवक एवढ्यावरच न थांबता त्याने मृत माकडाला झाडाला उलटे टांगून खेटराने बडविल्याची बाबही समोर आली आहे. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या आणि अत्यंत संताप निर्माण करणाऱ्या या घटनेतील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले. गावातील हमुमान मंदिरामध्ये दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ७.३० वाजता माजी सरपंच सिद्धेश्वर वाघ यांच्या हस्ते हनुमान प्रतिमेची पूजा करून मृत माकडाच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शांताराम गावंडे, डॉक्टर ईश्वर वाघ, दादाराव गावंडे, मधुकर गावंडे, कैलास गावंडे, ज्ञानेश्वर गावंडे, सारंगधर पन्हाळे, अमोल गावंडे,अवचित सोनवणे, इत्यादींची उपस्थिती होती.

Tuesday 21 November 2017

झाडाच्या स्वरुपात आई जिवंत.


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे माजी सरपंच श्री पुंडलिकराव गावंडे व त्यांच्या भावंडानी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वृद्धपकाळामुळे पुंडलिकराव गावंडे यांच्या आई श्रीमती चंद्रभागाबाई पाटीलबा गावंडे यांचे दिनांक १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. आईचे रक्षाविसर्जन तीर्थक्षेत्रावर न करता शेतातच खड्डा खोदून त्यामध्ये रक्षा विसर्जन करण्यात आले व त्यावर आम्रवृक्ष लावण्यात आला आहे. झाडाच्या स्वरुपात नेहमी माझी आई जिवंत असेल अशी भावना त्यांनी व त्यांच्या भावंडानी व्यक्त केली आहे. जलप्रदूषनाचा राक्षस दिवसेंदिवस वाढत असतांना पुंडलिकराव गावंडे यांनी निर्माण केलेला हा आदर्श कोळेगाव व कोळेगाव परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे. यापुढे गावातील प्रत्येक नागरिकांनी रक्षाविसर्जन नदी नाल्यात किंवा तीर्थक्षेत्रावर न करता आपापल्या शेतात करावा व तिथे वृक्षारोपण करून पर्यावरणास हातभार लावावा असे आवाहन पुंडलिकराव गावंडे व कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Saturday 11 November 2017

सोशल मिडीयाचा प्रभाव, मी कोळेगावकर ग्रुप तर्फे विविध उपक्रम

सोशल मिडीयाचा विकास कामासाठीसुद्धा उपयोग केला जाऊ शकतो हे सिद्ध झाले आहे तो कोळेगाव येथे राबविलेल्या  विविध उपक्रमांतून, भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील ‘मी कोळेगावकर’ या व्हाट्सअप ग्रुपवर कोळेगाव येथील युवक गावासंबाधित विविध विषयांवर चर्चा करतात. मागील चर्चा  ही शाळेतील समस्यांविषयी होती. शाळेच्या विविध समस्यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला व काय सुधारणा करता येऊ शकतात यावर विचारमंथन करण्यात आले. यावेळी गावातीलच तरुण सचिन सुसर यांनी शाळेतील खेळाच्या साहित्याविषयी चिंता व्यक्त केली आणि स्वतः प्रेरित होऊन शाळेस तीन फुटबॉल भेट दिले. गावातीलच जिल्हा परिषद शिक्षक श्री देविदास गावंडे सर यांनी गावातील होतकरू विध्यार्थ्यानाठी उन्हाळी सुट्टीमध्ये मोफत शिकवणी देणार असल्याचे जाहीर केले. गावाची खरी शोभा ही स्वच्छता असते त्यामुळे मी कोळेगावकर ग्रुप मधील सदस्यांनी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा येथे साफसफाई केली, एकंदरीत शोशल मिडीयाचा गंधही नसलेल्या गावात तरुणांनी एकी केली तर किती बदल घडू शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे असे म्हणता येईल. मोबाईलवर केवळ मनोरंजनासाठी फिरणारी बोटे केंव्हा विकासाची चर्चा करू लागलेत हे त्यानाही कळले नाही, कोणी कल्पना ही केली नसतांना सोशल मिडीयावर मिळत असलेल्या तरुणांच्या प्रतिसादामुळे ग्रुपमधील सदस्यांमध्ये कमालीचे चैतन्य संचारले आहे. केवळ निर्णय घेण्याचा अवकाश असतो की लगेच सर्व सदस्य कामाला लागतात. मी कोळेगावकर ग्रुपचे सर्व सदस्य गाव विकासासाठी झटत आहेत आणि त्यांना यशही मिळत आहे ही बाब नक्कीच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे असे म्हणण्यास हरकत नाही.

Friday 27 October 2017

कोळेगाव येथील तरुणांनी केली साफसफाई.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील आंबेडकर गल्लीमध्ये असलेल्या बाबासाहेब विचारमंच परिसरामध्ये गावातील तरुणांनी  साफसफाई करून परिसर स्वच्छ केला. स्वच्छता अभियान केवळ काही दिवसासाठी किंवा काही महिन्यांसाठी मर्यादित नसून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे गावातील सर्व तरुणांनी आपल्या वैयक्तिक स्वच्छते बरोबरच सार्वजनिक स्वच्छतेवरही भर दिल्यास आपला व पर्यायाने आपल्या परिसर रोगराईमुक्त राहण्यास मदत होईल अशी चर्चा यावेळी उपस्थित तरुणांनी केली. यावेळी दादाराव गावंडे, अवचित सोनवणे, कौतिक सोनवणे, अक्षय शिंदे, अंकुश अवसरमोल, राहुल साळवे, रामकृष्ण म्हस्के, सुगंधाबाई खंडाळे व इतरांची उपस्थिती होती.

Monday 23 October 2017

कोळेगाव येथे टाकी बांधकामाचे उद्घाटन.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे आंबेडकर गल्लीमध्ये पाणी साठवणुकीसाठी बऱ्याच दिवसापसुन मागणी होती ह्याची दखल घेवून गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच गजानन गावंडे यांच्या हस्ते पाणी साठवणूक टाकीच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. पाणी साठवणुकीसाठी होत असलेल्या टाकी बांधकामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विकास काम करत असतांना कुठलाही भेदभाव केला जाणार नाही व गाव विकासाठी राजकीय जोडे नेहमीच उंबरठ्याच्या बाहेर ठेवून आपण सदैव विकास कामासाठी तत्पर असू असे मत यावेळी गजानन गावंडे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रल्हाद गावंडे, पांडुरंग वाघ, दादाराव गावंडे, डी. पी. गावंडे, संतोष साळवे, मुकेश चौतमोल, अंकुश गावंडे, समाधान म्हस्के, राजू चौतमोल इत्यादींची उपस्थिती होती.

Sunday 1 October 2017

कोळेगाव येथे स्वच्छता अभियान

दिनांक १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे यानिमित्त भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे रिलायन्स फाउंडेशन, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. गावामध्ये स्वच्छता फेरी काढून विविध भागामध्ये साफसफाई करून तणनाशक फवारणी करण्यात आली. स्वच्छता अभियान केवळ ठराविक काळासाठी मर्यादित नसून ही सुदृढ जीवन जगण्यासाठी अखंड चालणारी क्रिया आहे त्यामुळे सर्वांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याचा कसोसीने प्रयत्न करावा असे आवाहन रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने सचिन सुसर यांनी केले.

Saturday 23 September 2017

Free online Computer courses

Hey friends if you are looking online computer courses then here is good news for you..we are starting online guidance like MS word, MS excel, MS power point and many other essential courses. This video guidance absolutely free for all of you for video guidance you have to click here or you can visit My YouTube Channel

Tuesday 5 September 2017

कोळेगाव येथे गणरायांना निरोप.


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शांततेत गणपती विसर्जन करण्यात आले. गणपती स्थापने पासून ते विसर्जनापर्यंतच्या काळात गावामध्ये धार्मिक आणि उत्साहवर्धक वातावरण असते. गणपती स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंतच्या काळात विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये समाज प्रबोधनपर कीर्तने, शालेय विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, भारुडे. भजने इत्यादींचा समावेश असतो. गणपती विसर्जनाच्या दिवशी गावकऱ्यांच्या वतीने सामुहिक भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. गणरायाची आरती करून सजविलेल्या बैलगाडीतून गावभर मिरवणूक काढण्यात आली. गावातील आबालवृद्धानी हिरीरीने गणरायांच्या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदविला. विशेष बाब म्हणजे कोळेगाव येथे डी.जे. बँडबाजा किंवा तत्सम बाबतीत नाचण्यावर मागील पंधरा वर्षापासून पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे आणि याचे काटेकोरपणे पालन देखील होत आहे परंतु गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, यात्रा असे सामुहिक कार्यक्रम यासाठी अपवाद असल्यामुळे गणपती मिरवणुकीत तरुणांनी यथेच्छ नाचण्याचा आनंद लुटला. एक गाव एक गणपती ही संकल्पना मागील दहा वर्षापासून कोळेगाव येथे राबविली जात आहे आणि यापुढेही चालू ठेवण्याचा गावकऱ्यांच्या मानस आहे.

Tuesday 20 December 2016

कोळेगाव येथे फोटो स्टुडीओचे उद्घाटन.


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे ‘यशवंत डिजिटल फोटो स्टुडीओचे उद्घाटन दिनांक १९ डिसेंबर रोजी करण्यात आले. दिवसेंदिवस रोजच्या व्यवहारामध्ये इंटरनेटचा उपयोग वाढत असल्यामुळे प्रत्येक व्यवहारासाठी इंटरनेट जवळपास आवश्यकच झाले आहे. ऑनलाईन कामे, झेरॉक्स, पासपोर्ट साईझ फोटो आदी छोट्या छोट्या कामांसाठी नागरिकांना बाहेरगावी जाऊन कामे करावी लागतात. नागरिकांची ही गरज ओळखून गावातच नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने प्रेरित होऊन येथील तरुण दादाराव गावंडे यांनी ‘यशवंत डिजिटल फोटो स्टुडीओचची सुरुवात केली आहे. सदरील स्टुडीओचे उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक व मा.सरपंच रामराव पा. गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मा. सरपंच पुंडलिकराव गावंडे, सरपंच गजानन गावंडे, उपसरपंच दादाराव गावंडे. सांडू साहेब मा. सरपंच पंडितराव गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, नंदकिशोर सुसर, रामचंद्र गावंडे, रमेश गावंडे, गणेश सोनवणे, अवचित सोनवणे आदींची उपस्थिती होती.

Wednesday 28 September 2016

कोळेगाव जि. प. शाळेस जाळ्या भेट.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे कै. लीलाबाई व्यायाम शाळेतर्फे कोळेगाव जिल्हा परिषद शाळेस वृक्ष संरक्षण जाळ्या भेट देण्यात आल्या. झाडे लावा झाडे जगवा’ हे घोष वाक्य खऱ्या अर्थाने कृतीत उतरविले आहे ते कोळेगाव येथील नवतरुण माजी सरपंच पंडितराव गावंडे यांनी. कोळेगाव येथील शाळेत विदयार्थी संख्या वाढावी व विद्यार्थ्यांचे शिक्षणातील स्वारस्य वाढावे यासाठी शाळेत आकर्षक रंगरंगोटी केलेली आहे. त्याच प्रमाणे शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले आहे. सदरील लावलेल्या झाडांना संरक्षण जाळ्या असल्यास झाडांना नुकसान होणार नाही या कल्पनेतून आणि ज्या शाळेत आपली पाल्य शिकताहेत त्या शाळेसाठी आपलेही काही देणे लागते या भावनेतून पंडितराव गावंडे यांनी स्वखर्चातून लोखंडी जाळ्या शाळेस भेट दिल्या आहेत. केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता प्रत्येकांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी शक्य होईल तेवढी मदत करावी असे आवाहन यावेळी माजी सरपंच पंडितराव गावंडे यांनी केले आहे. यावेळी शिक्षक नागने सर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील गावंडे, अंकुश गावंडे, शांताराम गावंडे, सांडू गावंडे, भाऊसाहेब गावंडे आदींची उपस्थिती होती.