Friday 19 October 2018

पाण्याच्या प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याची कोळेगावकर वासियांनी घेतली शपत


वर्तमान पत्रातील दुष्काळ संबधित बातम्या वाचून मन खिन्न होत असतांना भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील गावकऱ्यांच्या उपक्रम एकूण नक्कीच सुखद धक्का बसेल यात शंका नाही. दुष्काळ आला म्हणून घाबरून न जाता पाण्याचा प्रत्येक थेंब अन थेंब जमिनीत जिरवून जिद्दीने व हिमतीने दुष्काळावर मात करण्याची शपत कोळेगावकर वासियांनी घेतली आहे आणि ही बाब इतर गावांसाठी देखील अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची गडद छाया पसरली असून पिण्याच्या पाण्यासाहित गुरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. अनियमित पडणारा पाऊस सतत वाढणारी महागाई आणि शेत मालाला मिळणारा कमी भाव यामध्ये शेतकऱ्याचे कंबरडे पार मोडून गेले आहे. यावर्षीची परिस्थिती तर अत्यंत विदारक बनत चालली आहे भविष्यातील भिषण पाणी टंचाईचे संकट ओळखून शेतकऱ्यांनी केवळ चारा व पाण्याच्या भीतीने गुरे विक्रीस काढली आहेत.
प्रत्येक गोष्टीसाठी सरकार अबलंबून राहिल्यास काहीच साध्य होणार नाही आता आपल्यालाही सरकारच्या बरोबरीने किंबहुना सरकारच्या दोन पावले पुढे चालावे लागेल तरच या भिषण दुष्काळाचा सामना करता येईल आणि हिच बाब अधोरेखित करून कोळेगाव येथील आजी माजी सरपंच, विरोधक सदस्य राजकीय जोडे बाहेर काढून हनुमान मंदिर सभागृहात एकत्र आले. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी दुष्काळ परिस्थितीवर उपाय योजना करण्यासाठी हनुमान मंदिर सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. गावातील नागरिकांची व महिलांची या सभेस मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हिवाळ्यातच उन्हाळ्याची चालूल लागली असल्यामुळे व पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पावसाळ्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, शोष खड्डे खोदुन पाणी जमिनीतचजिरविणे इत्यादी उपाय योजना करण्याचे गावकऱ्यांनी ठरविले. यावेळी सरपंच सौ. सरलाबाई गजानन गावंडे, मा.सरपंच पुंडलिकराव गावंडे, पंडितराव गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, तेजराव गावंडे, गजानन गावंडे, आर.डी.बाबा, सांडू साहेब, रामू दादा, विलासराव गावंडे, डी. पी. गावंडे, नंदू सुसर, शालीकराव गावंडे, मारोती गावंडे, समाधान गावंडे, पांडुरंग आप्पा वाघ. अंकुश गावंडे यांच्या सह नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

1 comment:

  1. Customer feedback at homedepotsurvey is the most essential for the development of any organization

    ReplyDelete