देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे दिनांक १ डिसेंबर २०१६ रोजी जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण विभागातर्फे व्यवसाय शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांसाठी भारती मेळावा आयोजित केला आहे. सदरील मेळावा हा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय औरंगाबाद, देवगिरी महाविद्यालय, बोर्ड ऑफ अॅप्रेंटीस ट्रेनिंग मुंबई,सीएमआय औरंगाबाद,मसीआ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.(सदरील माहिती ही दैनिक सांजवार्ता दिनांक २० नोव्हेंबर २०१६ रोजीच्या वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे देलेली आहे.)
Sunday, 20 November 2016
Monday, 14 November 2016
शेत मालाला योग्य भाव हवा.
सततचा पडणारा दुष्काळ, अतिवृष्टी यामुळे शेतकरी
कायम चिंताग्रस्त असतो पण चालू वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे शेतकरी वर्गात
कमालीचा आनंद व्यक्त होत आहे. निसर्गाने या वर्षी साथ दिल्यामुळे शेतकऱ्यांचा
मालाचे उत्पादन वाढणार आहे. कपाशी, मक्का, सोयाबीन, तूर आदी पिके मोठ्या कष्टाने
शेतकऱ्याने जोपासले आहे. शासनाने शेतकऱ्याच्या मालास योग्य भाव दिल्यास तेंव्हाच खऱ्या
अर्थाने मेहनतीचे चीज होईल असे म्हणता येईल. शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा काणा
आहे, कोणताही राजकीय पक्ष असो त्या पक्षाचे नेते निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांच्या
शेतमालाला भाव वाढवून देऊ अशी आश्वासने देऊन निवडून येतात आणि सत्ता आली की त्यांना
त्यांच्या आश्वासनांचा विसर पडतो. शेतकऱ्यांची केवळ अनुदानावर बोळवण न करता शेतीसाठी
ठोस उपाय योजना करून शेतकऱ्यांसाठी विविध
योजना अंमलात आणाव्यात त्याचप्रमाणे शासकीय स्तरावर शेतीविषयक विविध चर्चासत्रे,
प्रात्याक्षिके, कार्यशाळा असे कार्यक्रम आयोजित करून राबविल्यास सदैव आर्थिक
विवंचनेत गुंतत चाललेला शेतकरी खऱ्या अर्थाने उभारी घेऊ शकेल यात शंका नाही.
( या लेखामध्ये संदर्भासाठी दिनांक १४ नोव्हेंबर २०१६ रोजी प्रकाशित झालेल्या दैनिक सकाळ वृत्तपत्रातील औरंगाबाद टुडे या पुरवणीतील कात्रणाचा उपयोग केला आहे)
Subscribe to:
Posts (Atom)