Wednesday 20 February 2019

शहिदांना अभिवादन करून कोळेगाव येथे शिवजयंती साजरी.


कोळेगाव येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळीच गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. शालेय विध्यार्थ्यानी आपले लेझीमचे कसब दाखून शिवजयंतीचा आनंद द्विगुणित केला. कोळेगावच्या सरपंच सौ सरलाबाई गजानन गावंडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
तत्पूर्वी काश्मीर येथील पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोळेगाव येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. भारतीय सैनिकांवर झालेला हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे त्यामुळे पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा भारताने मुहतोड जवाब द्यावा अशी भावना यावेळी उपस्थित तरुणांनी व्यक्त केली. प्रत्येकाने आपल्या गावासाठी, राज्यासाठी पर्यायी देशासाठी होईल तेवढे योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.

 गावातील नवतरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून त्यांचे विचार अंगीकारून प्रत्यक्ष कृती अमलात आणल्यास हेच खरे छत्रपतीं शिवाजी महाराजांना खरे अभिवादन ठरेल आणि शिवजयंती साजरी करण्याचे साफल्यही ठरेल असे मत यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केले.  कोळेगाव शिवजयंती उत्सव मंडळाने पुढील वर्षी एखादा सामाजिक उपक्रम राविल्यास अशा सामाजिक कार्यक्रमातून समाजात सकारात्मक संदेश जाईल असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले यावेळी गजानन गावंडे, पंडितराव गावंडे, पुंडलिकराव गावंडे, रामेश्वर गावंडे, नंदू सुसर, शालीकराव गावंडे, डॉ.ईश्वर वाघ, सांडू गावंडे, रामदास गावंडे, दादाराव गावंडे, चंदू गावंडे, भागवत गावंडे, संजय सुसर, गजानन गाढेकर, राजू गावंडे, रविंद्र गावंडे, योगेश गावंडे, शंकर गावंडे, नंदकिशोर गावंडे, नरेश कड, पवन गावंडे, नारायण वाघ, अवचीतराव सोनवणे, डी.जी.गावंडे आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.