Wednesday 24 July 2019

स्वत: भरा स्वतःच्या पिकांचा ऑनलाईन पिक विमा CSC सेंटरवर जाण्याची गरज नाही


मित्रांनो नमस्कार, पिक विमा केवळ सीएससी सेंटर किंवा बँकेतच जावून भरावा लागतो असा जर तुमचा समज असेल तर तो अगदी चुकीचा आहे कारण तुमचा पिक विमा तुम्ही स्वत: सद्धा भरू शकता. व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा प्रधान  मंत्री फसल बिमा योजना या वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नर या रकान्यामध्ये apply for crop insurance by yourself असा स्पष्ठ पर्याय दिला आहे त्यामुळे कुठेही न जाता आपण आपला पिक विमा भरू शकतो. तुमच्या जवळ laptop असेल तर उत्तम नसेल तर तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या intrnet कॅफेतील कॉम्प्युटरवर जा. तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या मुलाला घेऊन जा, मित्राला घेऊन जा काही अडचण आली तर माझा हा व्हिडीओ बघा आणि तुम्हीच तुमचा पिक विमा भरून घ्या..मग कसली वाट बघता लाईन सोडा आणि स्वत:चा पिक विमा स्वतः भरा. मित्रांनो मी या अगोदर देखील ऑनलाइन पिक विमा कसा भरावा या संदर्भात एक व्हिडीओ बनविला होता परंतु तो व्हीएलइ साठी होता आणि त्यासाठी तुमच्याकडे सी एस सी सेंटर असणे आवश्यक होते परंतु आजचा हा व्हिडीओ बघून कोणताही शेतकरी आपला स्वत:चा पिक विमा भरू शकतो. ना सीएस सी सेंटरवर जाण्याची गरज ना बँकेत जाण्याची गरज तर चला जाणून घेवूयात स्वत: ऑनलाइन पिक विमा कसा भरावा

No comments:

Post a Comment