Wednesday 23 October 2019

जमीन रजिस्ट्री किंवा हक्कसोड पत्रची प्रक्रिया समजावून घ्या


मित्रांनो नमस्कार, वडिलांच्या किंवा आईच्या नावे जमीन असेल आणि जर वडील किंवा आईचा मृत्यू झाल्यानंतर ती सर्व जमीन वारसांच्या नावे म्हणजेच बहिण आई आणि अर्जदार यांच्या नावे झाली असेल तर ती हक्कसोड प्रक्रीयाद्वारे अर्जदाराच्या नावे कशी करावी लागते या संबधीची माहिती आज या व्हिडीओद्वारे तुम्हाला सांगणार आहे, एक प्रकारे हि एक रजिस्ट्रीचीच प्रक्रिया असते, माहिती अभावी अशा कामाला पैसा आणि वेळ खूप लागतो. मी काही दिवसापूर्वी माझ्या वडिलांची जमिन वारस फेर आधारे माझ्या नावे केली एकप्रकारे रजिस्ट्री केली..त्यावेळी मला खूप अडचणी आल्या परंतु अडचणीतूनच काहीतरी शिकायला मिळते आणि मला वाटते कि ज्या अडचणी मला आल्या त्या तुम्हाला येवू नये किमान याविषयी सखोल माहितीतरी असावी.आज मी तुम्हाला माझ्या जमीन रजिस्ट्रीच्या ओरिजिनल कागदपात्रांसहित सोदाहरण माहिती सांगणार आहे कि जमिनीच्या हक्कसोड प्रक्रिया कशी असते, कोणत्या कार्यालयामध्ये संपर्क करावा लागतो, कोणकोणते कागदपत्रे लागतात. किती साक्षीदार लागतात चलनासाठी किती पैसे द्यावे लागतात. अर्ज कसा करावा लागतो हे सर्व तपशील अगदी ओरीजनल कागद पात्रांच्या उदाहरणासहित मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपणास विनंती आहे कि मी एखादा व्हिडिओ अपलोड केला तर त्याची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळावी यासाठी आपल्या मोबाईलच्या या लाल रंगाच्या बटनाला दाबून माझे युट्चॅयुब नल सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा.