Tuesday 3 May 2016

भैरवनाथ यात्रा महोत्सवाची सांगता.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे श्री भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव उत्साहात पार पडला. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भैरवनाथ महाराज यात्रेचे आयोजन करण्यात आले. भैरवनाथ महाराज या दैवतावर असंख्य भाविकांची श्रद्धा असल्यामुळे पंचक्रोशीतील भाविकांनी या यात्रेसाठी गर्दी केली होती. भंडाऱ्याच्या दिवशी यात्रेकरूंच्या मनोरंजनासाठी नाटकाचे तर यात्रेच्या दिवशी गीतांचा कार्यक्रम गावकऱ्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. गावातील तरुणांनी यात्रेदरम्यान आयोजित भंडारा व नवसाचे बरागाडे या कार्यक्रमासाठी व्यवस्थित नियोजन केल्यामुळे सदरील कार्यक्रम शांततेत पार पडला. अखंड हरीनाम साप्ताह, कीर्तन, भजनामुळे गावातील वातावरण चैतन्यमय झालेले आहे. अखंड हरीनाम साप्ताह दरम्यान रोज कीर्तनाद्वारे जाणीव जागृती करण्यात आली. भंडाऱ्याच्या कार्यक्रमात अन्न व पाण्याचे योग्य नियोजन केल्यामुळे होणारी नासाडी टाळता आली हे विशेष. 

No comments:

Post a Comment