Tuesday 10 May 2016

आणि मी लिहिता झालो...!


माणसाच्या आयुष्यामध्ये शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व आहे, याची जाणीव मला अनिल औंधकर साहेबांच्या सानिध्यात आल्यावर कळले औरंगाबाद येथे असतांना स्थापत्य अभियंता अनिल औंधकर यांच्याशी ओळख झाली आणि कामासाठी त्यांचाच संस्थेत नोकरी मिळाली. नोकरी करीत असतांना कमी शिक्षण असल्यामुळे अनेक अडथळे निर्माण होत होते. याप्रसंगी औंधकर साहेबांमुळे प्रेरित होऊन मी वाणिज्य शाखेची पदवी मिळवली. शिक्षणामुळे वाचनाची आवड निर्माण झाली, आणि वाचनातून लिहिण्याची प्रेरणा मिळत गेली. वि. स. खांडेकरबाबा भांडप्र. के अत्रेपु. ल. देशपांडे व. पू. काळे रा. रं बोराडे इत्यादि दिग्गज लेखकांचे साहित्य वाचनात आल्यानंतर वाचनाची आवड निर्माण झाली नसती तर नवलच. मला ही सारखे वाटायचे की आपणही यांच्यासारखे काहीतरी लिहावे आणि याच प्रयत्नातून मला लिहिण्याची प्रेरणा मिळाली. लिहण्यासाठी मनाची एकाग्रता असावी लागते त्यामुळे माणूस त्या लिखाणाशी एकप्रकारे समरूप होऊन जातो. एकदा मी लिहिलेला छोटासा लेख एका प्रसिद्ध वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झाला त्यावेळी वर्तमानपत्रामध्ये नाव छापून आल्याचा जो आनंद झाला तो शब्दात सांगता येणार नाही. लिहिण्याच्या माझ्या छंदाला आणखीनच उभारी मिळाली जेंव्हा माझे लेखमतेप्रतिक्रिया ह्या वेगवेगळ्या वर्तमान पत्रामधून प्रसिद्ध होत गेल्या आणि माझी लेखणी आणकीनच बळकट होत गेली. मागील पाच वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून मी सतत लिखाण करीत आहे. इंटरनेटवर लिखाणासाठी ब्लॉग स्वरुपात मुक्त मोफत जागतिक व्यासपीठ खुले झाले आहे. किती वाचक माझा ब्लॉग बघतात किती मित्र माझ्या लेखाची चर्चा करतात याची पर्वा न करता आठवड्यातून दोन तीनदा का होईना मी ब्लॉगवर नियमित लिखाण करीत आहे. कोणी प्रेरक असेल तर उत्तम बाब आहे आणि जर नसेल तर प्रेरणा ही स्वतः पासून घ्यावयाची असते स्वतःच स्वतःच्या पाठीवर कौतुकाची थाप मारायची असते ही जाणीव माझ्या मनात निर्माण झाली तो आजतागायतपर्यंत तशीच आहे. आयुष्यामध्ये बरेच जन मार्गदर्शन नसल्यामुळे भरकटत जातात, आणि त्याच वेळी काही व्यक्ती ह्या आपल्या आयुष्यामध्ये गुरुरूपी प्रवेश करतात आणि अवघे जीवनच बदलून जाते. मीही कदाचित भरकटलोच असतो जर मला योग्य मार्गदर्शन मिळाले नसते. आता मी औंधकर साहेबांसोबत काम करीत नसलो तरीही त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच मी इतरांशी कसे बोलावे कसे वागावे हे शिकलो आणि लिहिण्याचा छंद लागला तोही त्यांच्याच मुळे म्हणून म्हणावेसे वाटते थँक्यू औंधकर साहेब.

No comments:

Post a Comment