Wednesday 25 May 2016

प्रत्यक्ष कृतीतून विकास शक्य.


जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यापासून पासून १८ किमी अंतरावर असलेल्या कोळेगाव ग्रामपंचायतीला पाणी टंचाई हा शब्द कायमचा वळणी पडलेला. निवडणुका आल्या की प्रत्येकजण घोषणा देतात आणि त्या घोषणाच राहतात, ह्या सर्व विचार सरणीनां फाटा दिला आहे तो येथील एका युवकाने. कोळेगाव येथील युवक गजानन गावंडे यांनी २००० लोकसंख्या असलेल्या कोळेगाव वासीयांना मोफत पाणी पुरवठा करून आदर्श निर्माण केला आहे. गावकऱ्याना कायम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, पाणी टंचाईवर खारीचा वाटा म्हणून या तरूणाने आपल्या स्वतःच्या विहिरीतील पाणी गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले, स्व: खर्चातून स्वतःच्या विहिरीतले पाणी पईप लाईनद्वारे शासकीय विहिरीत सोडले जात असल्यामुळे काही प्रमाणात का होईना कोळेगाव येथील गावकऱ्यांचा चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या हे नक्की. युवकांना योग्य दिशा दिली आणि नेतृत्व केले तर समाज बदलायला काहीच वेळ लागत नाही हाच संदेश गजानन पाटील गांवडे युवकांना देत असून त्याचे सकारात्मक परिमाण युवकांमध्ये निर्माण होत आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपणाला काही देणे लागते, प्रत्येकांनी कोणतेही सामाजिक कार्य करण्यासाठी स्वतः पासून सुरुवात केली तर समाजात नक्कीच बदल घडू शकतो हे त्यांनी दाखवून दिल्यामुळे गावातील नवतरुण मंडळीमध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, आणि हाच एक टर्निंग पॉइंट गावाच्या विकासाला कारणीभूत ठरू शकेल शंका नाही.

No comments:

Post a Comment