how to link adhar card to SBI bank
Tuesday, 17 January 2017
Monday, 16 January 2017
Saturday, 14 January 2017
Tuesday, 20 December 2016
कोळेगाव येथे फोटो स्टुडीओचे उद्घाटन.
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे ‘यशवंत डिजिटल
फोटो स्टुडीओचे उद्घाटन दिनांक १९ डिसेंबर रोजी करण्यात आले. दिवसेंदिवस रोजच्या व्यवहारामध्ये
इंटरनेटचा उपयोग वाढत असल्यामुळे प्रत्येक व्यवहारासाठी इंटरनेट जवळपास आवश्यकच
झाले आहे. ऑनलाईन कामे, झेरॉक्स, पासपोर्ट साईझ फोटो आदी छोट्या छोट्या कामांसाठी
नागरिकांना बाहेरगावी जाऊन कामे करावी लागतात. नागरिकांची ही गरज ओळखून गावातच
नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हावी या हेतूने प्रेरित होऊन येथील तरुण दादाराव
गावंडे यांनी ‘यशवंत डिजिटल फोटो स्टुडीओचची सुरुवात केली आहे. सदरील स्टुडीओचे
उद्घाटन गावातील ज्येष्ठ नागरिक व मा.सरपंच रामराव पा. गावंडे यांच्या हस्ते
करण्यात आले. या प्रसंगी मा. सरपंच पुंडलिकराव गावंडे, सरपंच गजानन गावंडे, उपसरपंच
दादाराव गावंडे. सांडू साहेब मा. सरपंच पंडितराव गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, नंदकिशोर
सुसर, रामचंद्र गावंडे, रमेश गावंडे, गणेश सोनवणे, अवचित सोनवणे आदींची उपस्थिती
होती.
Friday, 9 December 2016
कार्यशाळेचे आयोजन.
दिनांक ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत फुलंब्रीकर
नाट्यगृहात पशुसंवर्धन विभागातर्फे कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन इत्यादी
व्यवसायाविषयी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहेत. ग्रामीण भागामध्ये उद्योग शेती
निगडीत उद्योग व्यवसाय करू इच्छीनाऱ्या तरुणांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. (सदरील
माहिती दैनिक देशोन्नती वर्तमान पत्रातील दिनांक १० डिसेंबर २०१६ रोजी प्रकाशित
झालेल्या बातमीच्या आधारे दिलेली आहे.)
Wednesday, 7 December 2016
कॉम्पुटर हार्डवेअर प्रशिक्षणाचे आयोजन.
आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये संगणक हा माणसाच्या जीवनामधला अत्यंत आवश्यक घटक बनला आहे.त्यामुळे या क्षेत्रामध्ये प्रचंड रोजगाराच्यासंधी निर्माण होत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथे महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र व जिल्हा उद्योग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने बेरोजगारांसाठी मोफत कॉम्पुटर हार्डवेअर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा.
(सूचना-सदरील माहिती ही दिनांक ८ डिसेंबर २०१६ रोजी प्रसिद्द झालेल्या दैनिक दिव्य मराठी या वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे देलेली आहे.)
Sunday, 20 November 2016
औरंगाबाद येथे नोकर भरती मेळावा
देवगिरी महाविद्यालय औरंगाबाद येथे दिनांक १ डिसेंबर २०१६ रोजी जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण विभागातर्फे व्यवसाय शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांसाठी भारती मेळावा आयोजित केला आहे. सदरील मेळावा हा जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय औरंगाबाद, देवगिरी महाविद्यालय, बोर्ड ऑफ अॅप्रेंटीस ट्रेनिंग मुंबई,सीएमआय औरंगाबाद,मसीआ औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थ्यानी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.(सदरील माहिती ही दैनिक सांजवार्ता दिनांक २० नोव्हेंबर २०१६ रोजीच्या वृत्तपत्रातील बातमीच्या आधारे देलेली आहे.)
Subscribe to:
Posts (Atom)