Tuesday 15 March 2016

कर्ज बुडव्यांना धडा शिकवाच.


सर्व सामान्य माणसाला कोणीच वाली नाही. त्यामध्ये तो शेतकरी असेल तर विचारूच नका. सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना मंजूर करून त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी गाजावाजा करते आणि दुसरीकडे बँकेतील साहेब कर्ज देण्यास टाळाटाळ करतात. फक्त कर्ज मिळवण्यासठी काही धनाढ्य व्यक्ती बँकेत कर्जासाठी अर्ज करतात आणि कर्ज मिळाले की त्यांना त्या योजनेशी काही देणे घेणे नसते आणि बऱ्याचदा बँक देखील याची शहानिशा करीत नाही. मल्ल्या सारख्यांना हजारोंचे कर्ज मिळतात आणि ते बुडवूही शकतात पण शेतकऱ्याला मात्र चपला फाटे पर्यंत बँकेचा दरवाजा ठोठावा लागतो आणि मिळालेच तर त्यातील काही हिस्सा बँकेतील साहेबांना द्यावा लागतो. पुढाऱ्यांचा वशिला लाउन श्रीमंताचे काम बँकेत लवकर होते आणि बँकेचे कर्ज हे बुडविण्यासाठीच असते अशी त्यांची धारणा झालेली असते त्यामुळे ज्यांनी बँकेचे कर्ज बुडविले अशा बँक डीफॉल्टर वर कडक कार्यवाही करण्यात यावी.

No comments:

Post a Comment