Saturday 28 October 2017

कोळेगावकरांचा 'सोशल कट्टा'

सध्या सोशल मिडियाचे युग आहे असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही व्हाट्सअप, फेसबुक, ट्वीटर, गुगल प्लस, युट्युब इत्यादी समाजमाध्यमांवर लोक बराच वेळ टेहळतांना दिसतात, परंतु भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील युवकांनी व्हाट्सअप या समाजमाध्यमालाच चर्चेचे व्यासपीठ बनविले आहे. दोन तीन दिवसामिळून सर्वांच्या चर्चेतून एक विषय निवडला जातो आणि त्यावर संध्याकाळी चर्चा केली जाते. ‘मी फक्त कोळेगावकर’ असे या व्हाट्सअप ग्रुपचे नाव असून सत्ताधारी ते विरोधक सार्वजन चर्चेत भाग घेतात आणि त्यावर चर्चा करतात. काही कारणास्तव बाहेरगावी असलेल्या कोळेगावकरनाही या सोशल माध्यमांवरील चर्चेमध्ये सहभागी होता येते, यामुळे गावातील समस्यावर काही प्रमाणात का होईना तोडगा काढण्याचा प्रयत्न याठिकाणी केला जातो आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही. सोशल मिडियाचे नकारात्मक परिणाम डोके वर काढत असताना कोळेगावकरानी चर्चेसाठी अवलंबलेले हे मध्यम सध्या सर्व गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल माध्यमांचा योग्य उपयोग केला तर ते शाप नसून वरदानच ठरत असल्याचे उदाहरण या ठिकाणी पहावयास मिळत आहे.

Friday 27 October 2017

कोळेगाव येथील तरुणांनी केली साफसफाई.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील आंबेडकर गल्लीमध्ये असलेल्या बाबासाहेब विचारमंच परिसरामध्ये गावातील तरुणांनी  साफसफाई करून परिसर स्वच्छ केला. स्वच्छता अभियान केवळ काही दिवसासाठी किंवा काही महिन्यांसाठी मर्यादित नसून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे गावातील सर्व तरुणांनी आपल्या वैयक्तिक स्वच्छते बरोबरच सार्वजनिक स्वच्छतेवरही भर दिल्यास आपला व पर्यायाने आपल्या परिसर रोगराईमुक्त राहण्यास मदत होईल अशी चर्चा यावेळी उपस्थित तरुणांनी केली. यावेळी दादाराव गावंडे, अवचित सोनवणे, कौतिक सोनवणे, अक्षय शिंदे, अंकुश अवसरमोल, राहुल साळवे, रामकृष्ण म्हस्के, सुगंधाबाई खंडाळे व इतरांची उपस्थिती होती.

Thursday 26 October 2017

HP laptop cooling fan not working 90 b error Solution.

hello friends if you are searching solution for system fan 90 B error HP laptop cooling fan not working correctly then here is the total solution click here for HP laptop cooling fan not working 90 b error

Monday 23 October 2017

कोळेगाव येथे टाकी बांधकामाचे उद्घाटन.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे आंबेडकर गल्लीमध्ये पाणी साठवणुकीसाठी बऱ्याच दिवसापसुन मागणी होती ह्याची दखल घेवून गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच गजानन गावंडे यांच्या हस्ते पाणी साठवणूक टाकीच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. पाणी साठवणुकीसाठी होत असलेल्या टाकी बांधकामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विकास काम करत असतांना कुठलाही भेदभाव केला जाणार नाही व गाव विकासाठी राजकीय जोडे नेहमीच उंबरठ्याच्या बाहेर ठेवून आपण सदैव विकास कामासाठी तत्पर असू असे मत यावेळी गजानन गावंडे यांनी व्यक्त केले. यावेळी प्रल्हाद गावंडे, पांडुरंग वाघ, दादाराव गावंडे, डी. पी. गावंडे, संतोष साळवे, मुकेश चौतमोल, अंकुश गावंडे, समाधान म्हस्के, राजू चौतमोल इत्यादींची उपस्थिती होती.

Sunday 1 October 2017

कोळेगाव येथे स्वच्छता अभियान

दिनांक १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे यानिमित्त भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे रिलायन्स फाउंडेशन, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. गावामध्ये स्वच्छता फेरी काढून विविध भागामध्ये साफसफाई करून तणनाशक फवारणी करण्यात आली. स्वच्छता अभियान केवळ ठराविक काळासाठी मर्यादित नसून ही सुदृढ जीवन जगण्यासाठी अखंड चालणारी क्रिया आहे त्यामुळे सर्वांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याचा कसोसीने प्रयत्न करावा असे आवाहन रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने सचिन सुसर यांनी केले.