Wednesday 20 April 2016

पाण्याचे ‘सेल्फिश’ राजकारण

सध्या महाराष्ट्र चांगलाच तापत आहे, दिवसेंदिवस तापमान वाढत चालले असून पाणी टंचाईच्या तीव्र झळा नागरिकांना बसत आहेत यावर तातडीने उपाय योजनेची आवश्यकता असून त्याएवजी नेते मंडळी केवळ राजकारण करत आहेत. बियर कंपन्याचे किमान तीन चार महिने पाणी बंद करून ते पिण्यासाठी वापरात आणणे ही सध्या अत्यंत महत्त्वाजी गरज आहे. पावसाळा आला की आपण सर्वच या विषयाला विसरून जातो आणि जेंव्हा उन्हाळा सुरु होतो किंबहुना पाणी टंचाई प्रकर्षाने जाणवते तेंव्हा सगळ्यांनाच पाणी टंचाईवर उपाय योजना करण्याचा पुळका सुटतो. पाणी टंचाईवर कायमचा तोडगा काढण्यासाठी पाण्याचे संवर्धन करायला हवे, त्यासाठी पाणी पुनर्भरण, छतावरील पाणी संकलन, अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्याची अत्यंत आवश्यकता असून त्यासंदर्भात जाणीव जागृती करायला हवी तेंव्हाच काही प्रमाणात हा प्रश्न सुटण्यास मदत होईल एवढे मात्र नक्की बाकी ‘सेल्फिश’ राजकारण्याना राजकारणाशिवाय दुसरे काहीच दिसू नये ही खरच गंभीर बाब आहे.

No comments:

Post a Comment