Sunday 17 April 2016

कोळेगाव येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून मोठ्या उत्सहात गावभर मिरवणूक काढल्यानंतर शेवटी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेसाठी आपले आयुष्य समर्पित केले असून आजच्या नागरिकांनी विशेषतः तरुणांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण करून समाजहितासाठी कार्य करावे अशी भावना यावेळी उपस्थित वक्त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास कोळेगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक गजानन गावंडे (सरपंच), सांडू पा. गावंडे (साहेब), पुंडलिकराव गावंडे (माजी सरपंच), डॉ. ईश्वर वाघ, संजय मगरे, सांडू शिंदे, दिलीप चौतमोल, शामराव मगरे, दादाराव गावंडे, कौतिकराव गावंडे, देविदास गावंडे, सारंगधर सुसर, संतोष चौतमोल,कृष्णा चौतमोल आदींची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment