दिनांक २० एप्रिल २०१९ रोजी
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सवानिमित्त अखंड
हरीनाम सप्ताह व संगीतमय भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. कोळेगाव येथील अखंड
हरीनाम सप्ताहामध्ये दिनांक २४ एप्रिल २०१९ रोजी रात्री ठीक ८.३० वाजता ह.भ.प. साहेबराव
महाराज गावंडे यांच्या जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्यसनधिनतेमुळे
तरुणवर्गात मोठ्या प्रमाणात नैराश्य वाढीस लागत आहे आणि अशा नैराश्यग्रस्त तरुण
पिढीच्या हातून देशसेवा घडणे अशक्यच आहे त्यामुळे तरुणांनी व्यसनधीनतेचा
विषाप्रमाणे त्याग करावा असा उपदेश वजा विनंती यावेळी ह.भ.प. साहेबराव महाराज
गावंडे यांनी तरुण वर्गास केली. व्यसनधीनतेबरोबरच इतर विविध सामाजिक मुद्द्यावर
त्यांनी आपल्या कीर्तनातून यावेळी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला. ह.भ.प. साहेबराव
महाराज गावंडे यांनी आपल्या सुमधुर वाणीने आणि सोदाहरणासहित केलेल्या कीर्त्नामुळे
श्रोतागण मंत्रमुग्ध झाले होते. आपल्या कीर्तनामुळे बोध घेऊन गावातील किमान दहा
तरुणांनी जरी व्यसन सोडले तरी आपल्या कीर्तनाचे फलित झाले असे समजण्यास हरकत नाही
असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
Friday, 26 April 2019
Wednesday, 20 February 2019
शहिदांना अभिवादन करून कोळेगाव येथे शिवजयंती साजरी.
तत्पूर्वी काश्मीर येथील पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोळेगाव येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. भारतीय सैनिकांवर झालेला हल्ल्याचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे त्यामुळे पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा भारताने मुहतोड जवाब द्यावा अशी भावना यावेळी उपस्थित तरुणांनी व्यक्त केली. प्रत्येकाने आपल्या गावासाठी, राज्यासाठी पर्यायी देशासाठी होईल तेवढे योगदान देणे महत्त्वाचे असल्याचे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले.
गावातील नवतरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासहित संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असून त्यांचे विचार अंगीकारून प्रत्यक्ष कृती अमलात आणल्यास हेच खरे छत्रपतीं शिवाजी महाराजांना खरे अभिवादन ठरेल आणि शिवजयंती साजरी करण्याचे साफल्यही ठरेल असे मत यावेळी गावकऱ्यांनी व्यक्त केले. कोळेगाव शिवजयंती उत्सव मंडळाने पुढील वर्षी एखादा सामाजिक उपक्रम राविल्यास अशा सामाजिक कार्यक्रमातून समाजात सकारात्मक संदेश जाईल असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त केले यावेळी गजानन गावंडे, पंडितराव गावंडे, पुंडलिकराव गावंडे, रामेश्वर गावंडे, नंदू सुसर, शालीकराव गावंडे, डॉ.ईश्वर वाघ, सांडू गावंडे, रामदास गावंडे, दादाराव गावंडे, चंदू गावंडे, भागवत गावंडे, संजय सुसर, गजानन गाढेकर, राजू गावंडे, रविंद्र गावंडे, योगेश गावंडे, शंकर गावंडे, नंदकिशोर गावंडे, नरेश कड, पवन गावंडे, नारायण वाघ, अवचीतराव सोनवणे, डी.जी.गावंडे आदिंसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Sunday, 23 December 2018
Thursday, 6 December 2018
Karbonn A9 Indian (Champagne) Low price mobile
Hello friends here is the low price mobile if you want to buy. Karbonn A9 is a very good product and affordable. just buy it by clicking above link from the Amezon. this will best deal for you
Saturday, 10 November 2018
Toshiba Canvio Basics 2TB USB 3.0 Portable External Hard Drive
Sunday, 4 November 2018
Low price laptops | Low budget laptops
Friday, 19 October 2018
पाण्याच्या प्रत्येक थेंब जमिनीत जिरविण्याची कोळेगावकर वासियांनी घेतली शपत
वर्तमान पत्रातील दुष्काळ संबधित बातम्या वाचून मन खिन्न होत असतांना भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील गावकऱ्यांच्या उपक्रम एकूण नक्कीच सुखद धक्का बसेल यात शंका नाही. दुष्काळ आला म्हणून घाबरून न जाता पाण्याचा प्रत्येक थेंब अन थेंब जमिनीत जिरवून जिद्दीने व हिमतीने दुष्काळावर मात करण्याची शपत कोळेगावकर वासियांनी घेतली आहे आणि ही बाब इतर गावांसाठी देखील अभिमानास्पद आणि प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळाची गडद छाया पसरली असून पिण्याच्या पाण्यासाहित गुरांसाठी चारा व पाण्याचा प्रश्न आ वासून उभा राहिला आहे. अनियमित पडणारा पाऊस सतत वाढणारी महागाई आणि शेत मालाला मिळणारा कमी भाव यामध्ये शेतकऱ्याचे कंबरडे पार मोडून गेले आहे. यावर्षीची परिस्थिती तर अत्यंत विदारक बनत चालली आहे भविष्यातील भिषण पाणी टंचाईचे संकट ओळखून शेतकऱ्यांनी केवळ चारा व पाण्याच्या भीतीने गुरे विक्रीस काढली आहेत.
प्रत्येक गोष्टीसाठी सरकार अबलंबून राहिल्यास काहीच साध्य होणार नाही आता आपल्यालाही सरकारच्या बरोबरीने किंबहुना सरकारच्या दोन पावले पुढे चालावे लागेल तरच या भिषण दुष्काळाचा सामना करता येईल आणि हिच बाब अधोरेखित करून कोळेगाव येथील आजी माजी सरपंच, विरोधक सदस्य राजकीय जोडे बाहेर काढून हनुमान मंदिर सभागृहात एकत्र आले. गावातील ज्येष्ठ नागरिकांनी दुष्काळ परिस्थितीवर उपाय योजना करण्यासाठी हनुमान मंदिर सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. गावातील नागरिकांची व महिलांची या सभेस मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
हिवाळ्यातच उन्हाळ्याची चालूल लागली असल्यामुळे व पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन पाण्याचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरविणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पावसाळ्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे, शोष खड्डे खोदुन पाणी जमिनीतचजिरविणे इत्यादी उपाय योजना करण्याचे गावकऱ्यांनी ठरविले. यावेळी सरपंच सौ. सरलाबाई गजानन गावंडे, मा.सरपंच पुंडलिकराव गावंडे, पंडितराव गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, तेजराव गावंडे, गजानन गावंडे, आर.डी.बाबा, सांडू साहेब, रामू दादा, विलासराव गावंडे, डी. पी. गावंडे, नंदू सुसर, शालीकराव गावंडे, मारोती गावंडे, समाधान गावंडे, पांडुरंग आप्पा वाघ. अंकुश गावंडे यांच्या सह नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Subscribe to:
Posts (Atom)