मित्रांनो नमस्कार, वडिलांच्या किंवा आईच्या नावे जमीन असेल आणि जर वडील किंवा आईचा मृत्यू झाल्यानंतर ती सर्व जमीन वारसांच्या नावे म्हणजेच बहिण आई आणि अर्जदार यांच्या नावे झाली असेल तर ती हक्कसोड प्रक्रीयाद्वारे अर्जदाराच्या नावे कशी करावी लागते या संबधीची माहिती आज या व्हिडीओद्वारे तुम्हाला सांगणार आहे, एक प्रकारे हि एक रजिस्ट्रीचीच प्रक्रिया असते, माहिती अभावी अशा कामाला पैसा आणि वेळ खूप लागतो. मी काही दिवसापूर्वी माझ्या वडिलांची जमिन वारस फेर आधारे माझ्या नावे केली एकप्रकारे रजिस्ट्री केली..त्यावेळी मला खूप अडचणी आल्या परंतु अडचणीतूनच काहीतरी शिकायला मिळते आणि मला वाटते कि ज्या अडचणी मला आल्या त्या तुम्हाला येवू नये किमान याविषयी सखोल माहितीतरी असावी.आज मी तुम्हाला माझ्या जमीन रजिस्ट्रीच्या ओरिजिनल कागदपात्रांसहित सोदाहरण माहिती सांगणार आहे कि जमिनीच्या हक्कसोड प्रक्रिया कशी असते, कोणत्या कार्यालयामध्ये संपर्क करावा लागतो, कोणकोणते कागदपत्रे लागतात. किती साक्षीदार लागतात चलनासाठी किती पैसे द्यावे लागतात. अर्ज कसा करावा लागतो हे सर्व तपशील अगदी ओरीजनल कागद पात्रांच्या उदाहरणासहित मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी आपणास विनंती आहे कि मी एखादा व्हिडिओ अपलोड केला तर त्याची माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळावी यासाठी आपल्या मोबाईलच्या या लाल रंगाच्या बटनाला दाबून माझे युट्चॅयुब नल सबस्क्राईब करा आणि घंटीचे बटन दाबा.
Wednesday, 23 October 2019
जमीन रजिस्ट्री किंवा हक्कसोड पत्रची प्रक्रिया समजावून घ्या

Sunday, 1 September 2019
कोळेगाव येथे बैलपाडव्या निमित्त कुस्ती स्पर्धेचे आयोजन
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव
येथे पोळा व बैल पाडवा सण उत्साहात साजरा करण्यात आला. कोळेगाव येथे दरवर्षी
पोळ्याच्या दुसऱ्या दिवसी बैल पाडव्याचे आयोजन केले जाते. पाडव्या निमित्त पंचक्रोशीतील
शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांसाहित भैरवनाथ महाराजांच्या मंदिरास प्रदक्षिणा घालून मोठ्या
भक्तीभावाने दर्शन घेतले. जवळपास एक लक्ष भाविक भक्तांची आवक जावक असलेल्या या
पाडव्यास गैरसोय होऊ नये यासाठी संस्थानच्या वतीने यावेळी विशेष व्यवस्था करण्यात
आली होती.
सोशल मिडीयाच्या काळात मैदानी
खेळ लोप पावत आहेत आणि याच बाबीचे महत्त्व लक्षात घेऊन कोळेगाव येथील भैरवनाथ
महाराज मंदिर परिसरामध्ये दरवर्षी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. राष्ट्रीय
पुरस्कार विजेत्या भोंगा या चित्रपटातील कलाकार अविनाश कोलेते यांची या कुस्ती
स्पर्धेस विशेष उपस्थिती होती. यावर्षी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ डॉ. ईश्वर वाघ यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात
आला. कोळेगाव
पंचक्रोशीतील हौशी मल्लांनी मोठ्या प्रमाणात पाडव्यास हजेरी लावून कुस्त्यांच्या
आनंद लुटला. ढगाळ हवामान व पावसाची रिप रिप असल्यामुळे कुस्ती स्पर्धेसाठी किती
मल्ल येथील याबाबत साशंकता निर्माण झाली होती मात्र मल्लांची उपस्थिती आणि उत्साह
वाखाणण्याजोगा होता. संस्थानच्या वतीने पुरविण्यात येत असलेल्या सोविसुविधामुळे
दिवसेंदिवस भक्तांच्या संख्येत वाढ होत असून लवकरच शासनाकडे तीर्थक्षेत्राचे
मानांकन मिळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत भैरवनाथ महाराज संस्थांच्या
अध्यक्षांनी व्यक्त केले. यावेळी संस्थानचे अध्यक्ष श्री सांडू गावंडे, आर.डी.
गावंडे, सखाराम सुसर, गजानन गावंडे, अनिल भाऊ गावंडे, पंडितराव गावंडे, पुंडलिकराव
गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, सारंगधर सुसर, तेजराव गावंडे, रामू दादा, उत्तमराव गावंडे,
रामचंद्र गावंडे, दादाराव गावंडे, साहेबराव महाराज, विठ्ठल महाराज, विष्णू ठुबे,
नंदकिशोर सुसर, भागवत गावंडे, राजू सोन्नी, कमलाकर गावंडे, परमेश्वर गावंडे, एकनाथ
सुसर, अंकुश गावंडे, रविंद्र गावंडे आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
प्रतिक्रिया
प्रतिक्रिया
“खेड्यातील तरुणांच्या सुप्त गुणांना या स्पर्धेमुळे वाव मिळेल तरुणांनी
मोबाईलवरील खेळापेक्षा मैदानी खेळाची कास धरावी, कोळेगावकरांचे मनापासून धन्यवाद”
अविनाश कोलते (राष्ट्रीय
पुरस्कार विजेता भोंगा चित्रपट कलाकार)
“कुस्ती स्पर्धेमुळे तरुणांच्या मनांत मैदानी खेळाविषयी
उत्सुकता निर्माण करणे यामुळे सोपे होईल ज्यामुळे त्यांची शारीरिक तंदरुस्ती वाढेल
आणि कुस्ती खेळाविषयी प्रचार आणि प्रसार देखील सहजतेने होईल”
पंडितराव गावंडे (मा.सरपंच
कोळेगाव)
“तरुणांच्या कला गुणांना
वाव मिळावा त्यांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोहत्सान मिळावे यासाठी दरवर्षी कोळेगाव
यथे कुस्तीस्पर्धा भरविली जाते. याही पुढे अधिक चांगल्या पद्धतीने कुस्ती स्पर्धा
आयोजित करण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे”
डॉ. ईश्वर वाघ (प्रतिष्ठित
गावकरी तथा सामाजिक कार्यकर्ता)
Monday, 12 August 2019
Friday, 9 August 2019
Monday, 29 July 2019
Download Pik pera pramanpatra PDF
Hello friends here is the pik pera pramanpatra. Pik pera praman patra is very important document to fill online crop insurance as well as other farming schemes. So if you don't know how to download pik pera or how to download sowing certificate then just click below then you can get pik pera sayavmghoshnapatra
CLICK HERE TO DOWNLOAD PIK PERA PRAMAN PATRA
Wednesday, 24 July 2019
स्वत: भरा स्वतःच्या पिकांचा ऑनलाईन पिक विमा CSC सेंटरवर जाण्याची गरज नाही
मित्रांनो नमस्कार, पिक विमा केवळ सीएससी सेंटर किंवा बँकेतच जावून भरावा लागतो असा जर तुमचा समज असेल तर तो अगदी चुकीचा आहे कारण तुमचा पिक विमा तुम्ही स्वत: सद्धा भरू शकता. व्हिडीओ बघण्यासाठी येथे क्लिक करा प्रधान मंत्री फसल बिमा योजना या वेबसाईटवर फार्मर्स कॉर्नर या रकान्यामध्ये apply for crop insurance by yourself असा स्पष्ठ पर्याय दिला आहे त्यामुळे कुठेही न जाता आपण आपला पिक विमा भरू शकतो. तुमच्या जवळ laptop असेल तर उत्तम नसेल तर तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या intrnet कॅफेतील कॉम्प्युटरवर जा. तुम्हाला जमत नसेल तर तुमच्या मुलाला घेऊन जा, मित्राला घेऊन जा काही अडचण आली तर माझा हा व्हिडीओ बघा आणि तुम्हीच तुमचा पिक विमा भरून घ्या..मग कसली वाट बघता लाईन सोडा आणि स्वत:चा पिक विमा स्वतः भरा. मित्रांनो मी या अगोदर देखील ऑनलाइन पिक विमा कसा भरावा या संदर्भात एक व्हिडीओ बनविला होता परंतु तो व्हीएलइ साठी होता आणि त्यासाठी तुमच्याकडे सी एस सी सेंटर असणे आवश्यक होते परंतु आजचा हा व्हिडीओ बघून कोणताही शेतकरी आपला स्वत:चा पिक विमा भरू शकतो. ना सीएस सी सेंटरवर जाण्याची गरज ना बँकेत जाण्याची गरज तर चला जाणून घेवूयात स्वत: ऑनलाइन पिक विमा कसा भरावा
Subscribe to:
Posts (Atom)