Fear
is the most obstacles in the life of human. Just step out, no matter what is situation,
no matter what will people says just through yourself for what you want. Take
risk and go ahead. If you hesitate for taking risk then no one can expect from
you. Just look back, many leaders had nothing but they had taken risk, taken
advantages of situations and made the name of him... face the problems...find
out solution because tough situations gave best lessons in the life thane any teachers. confidence is the most powerful weapon of man, just sharp it. Once you do it you will able to do if forever.
Thursday, 21 April 2016
Wednesday, 20 April 2016
पाण्याचे ‘सेल्फिश’ राजकारण
सध्या महाराष्ट्र चांगलाच तापत
आहे, दिवसेंदिवस तापमान वाढत चालले असून पाणी टंचाईच्या तीव्र झळा नागरिकांना बसत आहेत
यावर तातडीने उपाय योजनेची आवश्यकता असून त्याएवजी नेते मंडळी केवळ राजकारण करत
आहेत. बियर कंपन्याचे किमान तीन चार महिने पाणी बंद करून ते पिण्यासाठी वापरात आणणे
ही सध्या अत्यंत महत्त्वाजी गरज आहे. पावसाळा आला की आपण सर्वच या विषयाला विसरून
जातो आणि जेंव्हा उन्हाळा सुरु होतो किंबहुना पाणी टंचाई प्रकर्षाने जाणवते
तेंव्हा सगळ्यांनाच पाणी टंचाईवर उपाय योजना करण्याचा पुळका सुटतो. पाणी टंचाईवर
कायमचा तोडगा काढण्यासाठी पाण्याचे संवर्धन करायला हवे, त्यासाठी पाणी पुनर्भरण,
छतावरील पाणी संकलन, अशा प्रकारचे प्रकल्प राबविण्याची अत्यंत आवश्यकता असून त्यासंदर्भात
जाणीव जागृती करायला हवी तेंव्हाच काही प्रमाणात हा प्रश्न सुटण्यास मदत होईल एवढे
मात्र नक्की बाकी ‘सेल्फिश’ राजकारण्याना राजकारणाशिवाय दुसरे काहीच दिसू नये ही
खरच गंभीर बाब आहे.
Tuesday, 19 April 2016
Sunday, 17 April 2016
कोळेगाव येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
भोकरदन
तालुक्यातील कोळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती उत्साहात
साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून मोठ्या
उत्सहात गावभर मिरवणूक काढल्यानंतर शेवटी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश
टाकण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेसाठी आपले
आयुष्य समर्पित केले असून आजच्या नागरिकांनी विशेषतः तरुणांनी डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण करून समाजहितासाठी कार्य करावे अशी भावना यावेळी उपस्थित
वक्त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास कोळेगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक गजानन गावंडे
(सरपंच), सांडू पा. गावंडे (साहेब), पुंडलिकराव गावंडे (माजी सरपंच), डॉ. ईश्वर
वाघ, संजय मगरे, सांडू शिंदे, दिलीप चौतमोल, शामराव मगरे, दादाराव गावंडे,
कौतिकराव गावंडे, देविदास गावंडे, सारंगधर सुसर, संतोष चौतमोल,कृष्णा चौतमोल
आदींची उपस्थिती होती.
कोळेगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी..!
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शिवक्रांती नवदल मित्रमंडळातर्फे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गावभर प्रभातफेरी कडून हनुमान मंदिराजवळ भगवा ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी शिवाजी महाराजाच्या जीवन कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. प्रत्येक तरुणांनी शिवरायांचे गुण आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण केल्यास हेच खरे या शिवजयंतीचे फलस्वरूप असेल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. कोळेगाव येथील काही उत्साही तरुण मागील एकदोन वर्षापासून शिवजयंती साजरी करण्यासाठी सतत धडपडत होते, ह्या वेळेस त्यांच्या उत्स्फूर्तेला पाहून गावकरी मंडळीने देखील हिरीरीने ह्यावेळच्या शिवजयंतीमध्ये सहभाग नोंदविला. रक्तदान शिबीर, रक्तगट तपासणी शिबीर, वृक्षरोपण इत्यादी उपक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आल्यामुळे सदरील नवतरुणांचे गावभर कौतुक होत आहे. गजानन पाटील गावंडे सचिन सुसर, विनोद सुसर, अवचीतराव सोनवणे, शंकर गावंडे, प्रवीण भोंबे, अरुण गावंडे, विनोद गावंडे आदीं नवतरुणांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले
Subscribe to:
Posts (Atom)