Tuesday 9 August 2016

खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा..

शहराचा आणि गावाचा समतोल राखण्यासाठी खेड्यांचा विकास होणे अत्यन्त आवश्यक आहे. शासनाने रोजगाराभिमुख योजना राबवून खेडेगावातील तरुणांना प्रशिक्षित केले तर रोजगारासाठी शहरात होणारी गर्दी कमी होण्यास मदत होईल. दिवसेंदिवस कामानिमित्त ग्रामीण भागातील तरुण वर्ग शहराकडे वळतो आहे. वास्तविक पाहता कोणत्याही व्यक्तीला आपला गाव किंवा राष्ट्र आपणहून सोडावे लागत नाही केवळ परिस्थितीमुळे त्यांना हे करावे लागते. त्यामुळे गावातच रोजगाराची व्यवस्था उपलब्ध झाल्यास गाव तर प्रगत होईलच पण दिवसेंदिवस शहरात वाढत चाललेल्या गर्दीला आळा घालणे शक्य होईल. महात्मा गांधीने फार पूर्वीच म्हटले होते कि खेड्याकडे चला, पण आता पर्यंत तरी म्हणावा हा विषय सरकार ने गांभीर्याने घेतलेला दिसत नाही. आता अगदी खरोखरच गरज अशे ती खेड्याकडे वळण्याची. गावपातळीवर विविध शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना असतात. पण केवळ माहिती नसल्याने ग्रामीण भागातील तरुण शेतकरी वर्ग यापासून वंचित राहतो आणि माहिती असलीही तरी साहेबांचा खिसा गरम केल्याशिवाय काम होण्याची तसु भरही शक्यता नसते हि परिस्थिती बदलायला हवी. बेरोजगरीमुळे एकीकडे खेडी ओस पडताहेत तर शहरे अवाढव्य विस्तारत आहेत, त्यामुळे भविष्यात निर्माण होणारा हा धोका लक्षात घेऊन वेळीच उपाय योजना करायला हवी. ग्रामीण भागातील तरुणांना गावातच प्रशिक्षण देऊन शेतीपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण त्यासाठी लागणारे भाग भांडवलाची व्यवस्था केल्यास, गावमध्येच रोजगार निर्माण होईल परिणामी इतर तरूणांना हि त्यासोबत रोजगाराच्या संधी उपलब्ध होईल. तरुणांनी देखील केवळ नोकरीसाठी शिकता व्यवसायाभिमुख शिक्षणाची कास धरल्यास झपाट्याने फुगणारी शहरे आणि एकीकडे ओस पडणारी खेडी यांचा सुवर्णमध्य निघू शकेल अशी आशा करूयात.

1 comment:

  1. Dadarao Gavande: खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा.. >>>>> Download Now

    >>>>> Download Full

    Dadarao Gavande: खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा.. >>>>> Download LINK

    >>>>> Download Now

    Dadarao Gavande: खेड्यांचा सर्वांगीण विकास व्हावा.. >>>>> Download Full

    >>>>> Download LINK QH

    ReplyDelete