Wednesday 29 November 2017

खेड्यातील अवलिया तरुण करणार एड्सवर जाणीव जागृती


१ डिसेंबर हा जागतिक एड्स विरोधी दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. एड्स हा विषयच खूप मोठा आहे, एरवी पुण्यतिथी जयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या करणाऱ्या या देशात एड्स रोगाविषयी खूप कमी प्रमाणात बोलले जाते. मागील काही वर्षामध्ये एड्स रोगाविषयी तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर जाणीव जागृती होत आहे ही बाब आशादायक आणि स्वागताहार्य आहे. ग्रामीण भागामाध्ये तर लैंगिक विषयावर बोलणेच अस्पृश्य ठरवले जाते त्यामुळे एड्स सारख्या जीवघेण्या रोगाविषयी ग्रामीण नागरिकांना माहिती देणे खूपच कठीण होऊन जाते आणि हीच बाब अधोरेखित करून भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील युवक दादाराव गावंडे पुढे सरसावला आहे. सध्या जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत त्यामुळे व्हाट्सअप फेसबुक, युट्यूबचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याच सामाजिक माध्यमांचा उपयोग करून एड्स रोगाविषयी ग्रामीण युवकांमध्ये लघुपटाद्वारेमाहितीचा प्रसार करण्याचा दादाराव गावंडे या तरुणाचा मानस आहे. युट्यूब वर डीजीटल डीजी आणि रुरल टीव्ही असे दोन चॅनल्स हा तरुण चालवत आहे. वेगवेगळ्या शासकीय योजनेसाठी अर्ज कसे करावेत यासंदर्भात व्हिडिओद्वारे नागरिकांना मार्गदर्शन करण्याचे काम निरंतर हा तरुण करत आहे. किंवा गावामध्ये काही समस्या असेल तर त्या संदर्भात संबधित व्यक्तीची मुलाखत घेऊन ती समस्या सर्व गावकऱ्यांच्या समोर मांडून त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचे आपणासही काही देणे लागते याच भावनेतून आता एड्स रोगाविषयी १ डिसेंबर या जागतिक एड्स विरोधी दिनाच्या दिवशी गावातीलच काही तरुणांच्या मदतीने लघुपट निर्मितीची सुरुवात होत आहे. एड्स विषयी तरुणांच्या मनात थोडी देखील जागृती झाली तरी या लघुपटाचे हे खूप मोठे यश असेल यात तीळमात्र शंका नाही.

Tuesday 28 November 2017

Sony DSC-H300 Point & Shoot Camera (Black)

hey guys i if you want to do photography and video shooting with on camera, then here is good option for you just go to flipkart or clik below button nice camera

Monday 27 November 2017

Micromax X595 (Grey)

Nice mobile you must have to bought nice battery backup

Sony camera with video shoot

Hey guys what a great product this is.i have bought it from flipcart and started photography small business y

Tuesday 21 November 2017

झाडाच्या स्वरुपात आई जिवंत.


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे माजी सरपंच श्री पुंडलिकराव गावंडे व त्यांच्या भावंडानी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. वृद्धपकाळामुळे पुंडलिकराव गावंडे यांच्या आई श्रीमती चंद्रभागाबाई पाटीलबा गावंडे यांचे दिनांक १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. आईचे रक्षाविसर्जन तीर्थक्षेत्रावर न करता शेतातच खड्डा खोदून त्यामध्ये रक्षा विसर्जन करण्यात आले व त्यावर आम्रवृक्ष लावण्यात आला आहे. झाडाच्या स्वरुपात नेहमी माझी आई जिवंत असेल अशी भावना त्यांनी व त्यांच्या भावंडानी व्यक्त केली आहे. जलप्रदूषनाचा राक्षस दिवसेंदिवस वाढत असतांना पुंडलिकराव गावंडे यांनी निर्माण केलेला हा आदर्श कोळेगाव व कोळेगाव परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे. यापुढे गावातील प्रत्येक नागरिकांनी रक्षाविसर्जन नदी नाल्यात किंवा तीर्थक्षेत्रावर न करता आपापल्या शेतात करावा व तिथे वृक्षारोपण करून पर्यावरणास हातभार लावावा असे आवाहन पुंडलिकराव गावंडे व कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. 

Saturday 11 November 2017

सोशल मिडीयाचा प्रभाव, मी कोळेगावकर ग्रुप तर्फे विविध उपक्रम

सोशल मिडीयाचा विकास कामासाठीसुद्धा उपयोग केला जाऊ शकतो हे सिद्ध झाले आहे तो कोळेगाव येथे राबविलेल्या  विविध उपक्रमांतून, भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील ‘मी कोळेगावकर’ या व्हाट्सअप ग्रुपवर कोळेगाव येथील युवक गावासंबाधित विविध विषयांवर चर्चा करतात. मागील चर्चा  ही शाळेतील समस्यांविषयी होती. शाळेच्या विविध समस्यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला व काय सुधारणा करता येऊ शकतात यावर विचारमंथन करण्यात आले. यावेळी गावातीलच तरुण सचिन सुसर यांनी शाळेतील खेळाच्या साहित्याविषयी चिंता व्यक्त केली आणि स्वतः प्रेरित होऊन शाळेस तीन फुटबॉल भेट दिले. गावातीलच जिल्हा परिषद शिक्षक श्री देविदास गावंडे सर यांनी गावातील होतकरू विध्यार्थ्यानाठी उन्हाळी सुट्टीमध्ये मोफत शिकवणी देणार असल्याचे जाहीर केले. गावाची खरी शोभा ही स्वच्छता असते त्यामुळे मी कोळेगावकर ग्रुप मधील सदस्यांनी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा येथे साफसफाई केली, एकंदरीत शोशल मिडीयाचा गंधही नसलेल्या गावात तरुणांनी एकी केली तर किती बदल घडू शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे असे म्हणता येईल. मोबाईलवर केवळ मनोरंजनासाठी फिरणारी बोटे केंव्हा विकासाची चर्चा करू लागलेत हे त्यानाही कळले नाही, कोणी कल्पना ही केली नसतांना सोशल मिडीयावर मिळत असलेल्या तरुणांच्या प्रतिसादामुळे ग्रुपमधील सदस्यांमध्ये कमालीचे चैतन्य संचारले आहे. केवळ निर्णय घेण्याचा अवकाश असतो की लगेच सर्व सदस्य कामाला लागतात. मी कोळेगावकर ग्रुपचे सर्व सदस्य गाव विकासासाठी झटत आहेत आणि त्यांना यशही मिळत आहे ही बाब नक्कीच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे असे म्हणण्यास हरकत नाही.