Tuesday, 19 April 2016
Sunday, 17 April 2016
कोळेगाव येथे आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
भोकरदन
तालुक्यातील कोळेगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती उत्साहात
साजरी करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पित करून मोठ्या
उत्सहात गावभर मिरवणूक काढल्यानंतर शेवटी बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर प्रकाश
टाकण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर सर्वसामान्य जनतेसाठी आपले
आयुष्य समर्पित केले असून आजच्या नागरिकांनी विशेषतः तरुणांनी डॉ. बाबासाहेब
आंबेडकरांच्या विचारांचे अनुकरण करून समाजहितासाठी कार्य करावे अशी भावना यावेळी उपस्थित
वक्त्यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमास कोळेगाव येथील प्रतिष्ठीत नागरिक गजानन गावंडे
(सरपंच), सांडू पा. गावंडे (साहेब), पुंडलिकराव गावंडे (माजी सरपंच), डॉ. ईश्वर
वाघ, संजय मगरे, सांडू शिंदे, दिलीप चौतमोल, शामराव मगरे, दादाराव गावंडे,
कौतिकराव गावंडे, देविदास गावंडे, सारंगधर सुसर, संतोष चौतमोल,कृष्णा चौतमोल
आदींची उपस्थिती होती.
कोळेगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी..!
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शिवक्रांती नवदल मित्रमंडळातर्फे शिवजयंतीचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी गावभर प्रभातफेरी कडून हनुमान मंदिराजवळ भगवा ध्वजारोहण करण्यात आला. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी शिवाजी महाराजाच्या जीवन कार्यावर थोडक्यात प्रकाश टाकला. प्रत्येक तरुणांनी शिवरायांचे गुण आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण केल्यास हेच खरे या शिवजयंतीचे फलस्वरूप असेल अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली. कोळेगाव येथील काही उत्साही तरुण मागील एकदोन वर्षापासून शिवजयंती साजरी करण्यासाठी सतत धडपडत होते, ह्या वेळेस त्यांच्या उत्स्फूर्तेला पाहून गावकरी मंडळीने देखील हिरीरीने ह्यावेळच्या शिवजयंतीमध्ये सहभाग नोंदविला. रक्तदान शिबीर, रक्तगट तपासणी शिबीर, वृक्षरोपण इत्यादी उपक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आल्यामुळे सदरील नवतरुणांचे गावभर कौतुक होत आहे. गजानन पाटील गावंडे सचिन सुसर, विनोद सुसर, अवचीतराव सोनवणे, शंकर गावंडे, प्रवीण भोंबे, अरुण गावंडे, विनोद गावंडे आदीं नवतरुणांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले
Subscribe to:
Posts (Atom)