Tuesday, 28 November 2017
Monday, 27 November 2017
Tuesday, 21 November 2017
झाडाच्या स्वरुपात आई जिवंत.
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव
येथे माजी सरपंच श्री पुंडलिकराव गावंडे व त्यांच्या भावंडानी वेगळा आदर्श निर्माण
केला आहे. वृद्धपकाळामुळे पुंडलिकराव गावंडे यांच्या आई श्रीमती चंद्रभागाबाई
पाटीलबा गावंडे यांचे दिनांक १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. आईचे रक्षाविसर्जन तीर्थक्षेत्रावर
न करता शेतातच खड्डा खोदून त्यामध्ये रक्षा विसर्जन करण्यात आले व त्यावर
आम्रवृक्ष लावण्यात आला आहे. झाडाच्या स्वरुपात नेहमी माझी आई जिवंत असेल अशी
भावना त्यांनी व त्यांच्या भावंडानी व्यक्त केली आहे. जलप्रदूषनाचा राक्षस
दिवसेंदिवस वाढत असतांना पुंडलिकराव गावंडे यांनी निर्माण केलेला हा आदर्श कोळेगाव
व कोळेगाव परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे. यापुढे गावातील प्रत्येक नागरिकांनी
रक्षाविसर्जन नदी नाल्यात किंवा तीर्थक्षेत्रावर न करता आपापल्या शेतात करावा व
तिथे वृक्षारोपण करून पर्यावरणास हातभार लावावा असे आवाहन पुंडलिकराव गावंडे व
कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
Saturday, 11 November 2017
सोशल मिडीयाचा प्रभाव, मी कोळेगावकर ग्रुप तर्फे विविध उपक्रम
सोशल मिडीयाचा विकास कामासाठीसुद्धा उपयोग केला
जाऊ शकतो हे सिद्ध झाले आहे तो कोळेगाव येथे राबविलेल्या विविध उपक्रमांतून, भोकरदन तालुक्यातील कोळेगाव
येथील ‘मी कोळेगावकर’ या व्हाट्सअप ग्रुपवर कोळेगाव येथील युवक गावासंबाधित विविध विषयांवर
चर्चा करतात. मागील चर्चा ही शाळेतील
समस्यांविषयी होती. शाळेच्या विविध समस्यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला व काय
सुधारणा करता येऊ शकतात यावर विचारमंथन करण्यात आले. यावेळी गावातीलच तरुण सचिन
सुसर यांनी शाळेतील खेळाच्या साहित्याविषयी चिंता व्यक्त केली आणि स्वतः प्रेरित
होऊन शाळेस तीन फुटबॉल भेट दिले. गावातीलच जिल्हा परिषद शिक्षक श्री देविदास
गावंडे सर यांनी गावातील होतकरू विध्यार्थ्यानाठी उन्हाळी सुट्टीमध्ये मोफत शिकवणी
देणार असल्याचे जाहीर केले. गावाची खरी शोभा ही स्वच्छता असते त्यामुळे मी
कोळेगावकर ग्रुप मधील सदस्यांनी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा येथे साफसफाई
केली, एकंदरीत शोशल मिडीयाचा गंधही नसलेल्या गावात तरुणांनी एकी केली तर किती बदल
घडू शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे असे म्हणता येईल. मोबाईलवर केवळ मनोरंजनासाठी फिरणारी
बोटे केंव्हा विकासाची चर्चा करू लागलेत हे त्यानाही कळले नाही, कोणी कल्पना ही
केली नसतांना सोशल मिडीयावर मिळत असलेल्या तरुणांच्या प्रतिसादामुळे ग्रुपमधील
सदस्यांमध्ये कमालीचे चैतन्य संचारले आहे. केवळ निर्णय घेण्याचा अवकाश असतो की
लगेच सर्व सदस्य कामाला लागतात. मी कोळेगावकर ग्रुपचे सर्व सदस्य गाव विकासासाठी
झटत आहेत आणि त्यांना यशही मिळत आहे ही बाब नक्कीच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे
असे म्हणण्यास हरकत नाही.
Saturday, 28 October 2017
कोळेगावकरांचा 'सोशल कट्टा'
सध्या सोशल मिडियाचे युग आहे असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही व्हाट्सअप, फेसबुक, ट्वीटर, गुगल प्लस, युट्युब इत्यादी समाजमाध्यमांवर लोक बराच वेळ टेहळतांना दिसतात, परंतु भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील युवकांनी व्हाट्सअप या समाजमाध्यमालाच चर्चेचे व्यासपीठ बनविले आहे. दोन तीन दिवसामिळून सर्वांच्या चर्चेतून एक विषय निवडला जातो आणि त्यावर संध्याकाळी चर्चा केली जाते. ‘मी फक्त कोळेगावकर’ असे या व्हाट्सअप ग्रुपचे नाव असून सत्ताधारी ते विरोधक सार्वजन चर्चेत भाग घेतात आणि त्यावर चर्चा करतात. काही कारणास्तव बाहेरगावी असलेल्या कोळेगावकरनाही या सोशल माध्यमांवरील चर्चेमध्ये सहभागी होता येते, यामुळे गावातील समस्यावर काही प्रमाणात का होईना तोडगा काढण्याचा प्रयत्न याठिकाणी केला जातो आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही. सोशल मिडियाचे नकारात्मक परिणाम डोके वर काढत असताना कोळेगावकरानी चर्चेसाठी अवलंबलेले हे मध्यम सध्या सर्व गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल माध्यमांचा योग्य उपयोग केला तर ते शाप नसून वरदानच ठरत असल्याचे उदाहरण या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
Friday, 27 October 2017
कोळेगाव येथील तरुणांनी केली साफसफाई.
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील आंबेडकर गल्लीमध्ये असलेल्या बाबासाहेब विचारमंच परिसरामध्ये गावातील
तरुणांनी साफसफाई
करून परिसर स्वच्छ केला. स्वच्छता अभियान केवळ काही दिवसासाठी किंवा काही
महिन्यांसाठी मर्यादित नसून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे गावातील
सर्व तरुणांनी आपल्या वैयक्तिक स्वच्छते बरोबरच सार्वजनिक स्वच्छतेवरही भर दिल्यास
आपला व पर्यायाने आपल्या परिसर रोगराईमुक्त राहण्यास मदत होईल अशी चर्चा यावेळी
उपस्थित तरुणांनी केली. यावेळी दादाराव गावंडे, अवचित सोनवणे, कौतिक सोनवणे, अक्षय
शिंदे, अंकुश अवसरमोल, राहुल साळवे, रामकृष्ण म्हस्के, सुगंधाबाई खंडाळे व इतरांची
उपस्थिती होती.
Subscribe to:
Posts (Atom)