कोळेगाव येथील प्रतिष्ठित
नागरिक श्री रामदास दगदुबा गावंडे यांचे वडील कै. दगडूबा मारोती गावंडे यांचे दिनांक
४ मार्च २०१८ रोजी रात्री ११:५० वाजता वयाच्या ११० व्या वर्षी निधन झाले. आजच्या
धावपळीच्या काळात ८० वर्षे वयाचा टप्पा पार करणेही जिकरीचे झाले असतांना दगदुबा
गावंडे यांनी ११० वर्षे जगलेले जीवन गावकऱ्यांसाठी प्रेरणादायी विषय ठरत आहे. योग्य
वेळी आहार, निर्व्यसनीपणा, सकारात्मक विचारदृष्टी व संकटकाळी धैर्याने परिस्थितीवर
मात करणे यामुळे गाव व गाव परिसरामध्ये बाबांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यांनी
समाजकारण, राजकारण व कलाक्षेत्रामध्ये एक वेगळी छबी निर्माण केली होती. त्यांच्या
जाण्याने गावातील अष्टपैलू नेतृत्व हरपल्याचे मत, गावातील सरपंच, माजी सरपंच, ग्रामपंचायत
सदस्य तथा प्रतिष्ठित नागरिकांनी व्यक्त केले आहे. बाबांचा समाजकारण आणि
कलाक्षेत्राचा वारसा यापुढेही आम्ही निरंतर चालविण्याच्या प्रयत्न करू असे मत
त्यांचे पुत्र रामदास गावंडे यांनी व्यक्त केला आहे, त्यांच्या पश्चात ५ मुले व २
मुली असा मोठा परिवार परिवार आहे.
Tuesday, 6 March 2018
Wednesday, 21 February 2018
Lowest price HD computer monitor
Hello friends if you are searching low price computer monitor then you are reach on right place. Here is the lowest price monitor on flipkart zebronics 16 inch hd monitor with best quality. if you want to buy this lowest price hd computer monitor then click on the following button
Sony Pendrive
http://fkrt.it/gnvKELuuuN
Monday, 19 February 2018
कोळेगाव येथे शिवजयंती उत्साहात साजरी (२०१८)
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शिवजयंती मोठ्या
उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते छत्रपतीशिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेतील
छोट्या मुलांनी लेझीमची कला सादर करीत गावकऱ्यांची मने जिंकली.तरुणांनी नियोजनबद्ध
पद्धतीने गावातून मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंड्याजवळ
मिरवणुकीची सांगता केली. गावातील युवकांनी आपापल्या परीने छत्रपती शिवाजी
महाराजांच्या जीवन कार्यावर यावेळी प्रकाश टाकला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन
हे प्रत्येक तरुणांसाठी सदैव प्रेरणादायी असून प्रत्येक तरुणांनी त्यांच्या
कार्याचा आदर्श घेतल्यास एक चांगला समाज घडविण्यास मदत होऊ शकते आणि हीच बाब
अधोरेखित करून कोळेगाव येथील तरुणांनी मागील काही वर्षांपासून शिवजयंती साजरी
करण्यास सुरुवात केली असून त्यामध्ये दरवर्षी सुधारणा होत आहे आणि हि बाब नक्कीच
अभिमानास्पद आहे. याप्रसंगी कोळेगाव येथील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व
प्रतिष्ठित नागरिकांसहित ग्रामस्थांची उपस्थिती होती.
Wednesday, 14 February 2018
Saturday, 6 January 2018
Monday, 18 December 2017
'त्या' घटनेचा कोळेगाव येथे निषेध
रिसोड
तालुक्यातील कुऱ्हा मांडवा येथे जखमी अवस्थेतील माकडाला जिवंत मारल्यानंतर त्याच्या
मृतदेहास झाडावर लटकवून प्रातरणा करण्याऱ्या घटनेचा भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे
तीव्र निषेध करण्यात आला. सामाजिक माध्यमावरील एका चित्रफितीमध्ये माकडाला जखमी
करून अत्यंत निर्दयीपणे मारण्यात आल्याचे दिसत आहे. माकडाला मारणारा निर्दयी युवक
एवढ्यावरच न थांबता त्याने मृत माकडाला झाडाला उलटे टांगून खेटराने बडविल्याची
बाबही समोर आली आहे. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या आणि अत्यंत संताप निर्माण करणाऱ्या या घटनेतील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त
केले. गावातील हमुमान मंदिरामध्ये दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ७.३०
वाजता माजी सरपंच सिद्धेश्वर वाघ यांच्या हस्ते हनुमान प्रतिमेची पूजा करून मृत
माकडाच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शांताराम
गावंडे, डॉक्टर ईश्वर वाघ, दादाराव गावंडे, मधुकर गावंडे, कैलास गावंडे, ज्ञानेश्वर
गावंडे, सारंगधर पन्हाळे, अमोल गावंडे,अवचित सोनवणे, इत्यादींची उपस्थिती होती.
Wednesday, 29 November 2017
खेड्यातील अवलिया तरुण करणार एड्सवर जाणीव जागृती
१ डिसेंबर हा जागतिक एड्स विरोधी
दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. एड्स हा विषयच खूप मोठा आहे, एरवी पुण्यतिथी
जयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या करणाऱ्या या देशात एड्स रोगाविषयी खूप कमी
प्रमाणात बोलले जाते. मागील काही वर्षामध्ये एड्स रोगाविषयी तरुणांमध्ये मोठ्या
प्रमाणावर जाणीव जागृती होत आहे ही बाब आशादायक आणि स्वागताहार्य आहे. ग्रामीण
भागामाध्ये तर लैंगिक विषयावर बोलणेच अस्पृश्य ठरवले जाते त्यामुळे एड्स सारख्या
जीवघेण्या रोगाविषयी ग्रामीण नागरिकांना माहिती देणे खूपच कठीण होऊन जाते आणि हीच
बाब अधोरेखित करून भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील युवक दादाराव गावंडे पुढे
सरसावला आहे. सध्या जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत त्यामुळे व्हाट्सअप
फेसबुक, युट्यूबचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याच सामाजिक माध्यमांचा
उपयोग करून एड्स रोगाविषयी ग्रामीण युवकांमध्ये लघुपटाद्वारेमाहितीचा प्रसार
करण्याचा दादाराव गावंडे या तरुणाचा मानस आहे. युट्यूब वर “डीजीटल डीजी” आणि “रुरल टीव्ही” असे दोन चॅनल्स हा तरुण चालवत आहे. वेगवेगळ्या शासकीय योजनेसाठी अर्ज कसे करावेत यासंदर्भात व्हिडिओद्वारे नागरिकांना मार्गदर्शन
करण्याचे काम निरंतर हा तरुण करत आहे. किंवा गावामध्ये काही समस्या असेल तर त्या
संदर्भात संबधित व्यक्तीची मुलाखत घेऊन ती समस्या सर्व गावकऱ्यांच्या समोर मांडून
त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या
समाजाचे आपणासही काही देणे लागते याच भावनेतून आता एड्स रोगाविषयी १ डिसेंबर या जागतिक
एड्स विरोधी दिनाच्या दिवशी गावातीलच काही तरुणांच्या मदतीने लघुपट निर्मितीची
सुरुवात होत आहे. एड्स विषयी तरुणांच्या मनात थोडी देखील जागृती झाली तरी या लघुपटाचे
हे खूप मोठे यश असेल यात तीळमात्र शंका नाही.
Subscribe to:
Posts (Atom)