जालना जिल्ह्यातील भोकरदन
तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी,कर्मचारी व आशा
वर्कर यांचे कोळगाव येथील गावकऱ्यांनी पुष्पवृष्टी करून स्वागत केले.
पिंपळगाव प्राथमिक आरोग्य
केंद्रात सर्व डॉक्टर,कर्मचारी हे जागरूकतेने काम करीत आहेत सोबतच या कोरोनाच्या
लढाईत ते गावात जनजागृती करत आहेत त्यामुळे कोरोनाचे भय निघून गेले असून त्यासाठी
काळजी घेणे आवश्यक आहे म्हणून गावकरी तशी काळजी घेत आहेत. सोशल डिस्टनसिंगचे नियम
पाळून गावातील व्यवहार सुरळीत चालू आहेत. प्राथमिक
आरोग्य केंद्राच्या डॉक्टर व कर्मचारी वर्गाने वेळोवेळी मार्गदर्शन केल्याने
गावकाऱ्यांना धीर मिळाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी निर्णय घेतला की रात्रंदिवस
मेहेनत घेणाऱ्या या डॉक्टर व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांचे
पुष्पवृष्टीने स्वागत करावे. गावकरी देखील तुमच्या कार्यात तेव्हडीच साथ देणार हा
आत्मविश्वास निर्माण व्हावा ही त्यामागची भूमिका. त्यामुळे गावकऱ्यांनी एकत्र येत
सोशल डिस्टनसिंगचा नियम पाळत प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. राऊत,डॉ शिंदे,डॉ फदाट, ANM खेसर मॅडम,आशा वर्कर मनीषा
सुरडकर अंगणवाडी सेविका या सर्वांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले. यावेळी
जिल्हापरिषद केशव पाटील जंजाळ पंचायत समिती सदस्य सुदाम पाटील देठे, सरपंच गजानन
पाटील गावंडे, माजी सरपंच पंडित पाटील, भैरवनाथ संस्थान अध्यक्ष सांडू साहेब
गावंडे माजी सरपंच पुंडलिक पाटील गावंडे, माजी सरपंच तेजराव पाटील गावंडे, डॉ ईश्वर वाघ
ग्रामपंचायत सदस्य नंदू पाटील सुसर यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी गावकरी या
कौतुक सोहळ्यात सामील झाले होते.
कोरोनाच्या या लढाईत 24
तास काम कारणाऱ्या डॉक्टर्स व अधिकारी कर्मचाऱ्यांना गावकरी साथ देतात व त्यांच्या
सेवेचे कौतुक करतात हा पायंडा या गावाने पाडून दिला असून कोरोनाशी लढ्यासाठी आम्ही
सर्व सोबत आहोत हे दाखवून दिले आहे.