जिल्हाउद्योग केंद्र जालना यांच्या मार्फत सन
२०१६-१७ या आर्थिक वर्षासाठीसाठी जालना जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना
नवीन उद्योग व्यवसाय सुरु करण्यासाठी सुधारित बीजभांडवल योजनेतर्गत अर्ज
मागविण्यात येत आहेत. गरजू आणि होतकरू तरुणांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी
संबधित व्यक्तीकडे बातमी वाचून सखोल चौकशी करावी.
Monday, 17 October 2016
Saturday, 8 October 2016
शंकेखोर प्रवृत्तीचे सर्जिकल व्हावे..!
भारतीय लष्कराने केलेली सर्जिकल स्ट्राईक्सची
कृती अपरिहार्य आणि अनिवार्य होती पाकिस्तानच्या मुजोरीचा तो एकप्रकारे मुहतोड
जवाब होता. याबाबत सध्या भारतामध्ये राजकीय वादळ निर्माण होत आहे, अशा मुद्द्यावर
बोलताना राजकीय नेत्यांनी थोडे तारतम्य बाळगायला हवे. राजकीय कंडू शमविण्यासाठी सर्जिकल
स्ट्राईक बाबत पुरावे मागून लष्करालाच खोटे ठरविणे ही मनोवृत्ती भारतीय लष्कराच्या
निष्ठा व विश्वासहर्तेला सुरुंग लावणारी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारण,
आंतरराष्ट्रीय संबध, देशांतर्गत परिस्थिती, शेजारी देशाशी असलेले संबध व देशाची
संरक्षक विषयक भूमिका या सर्वांच्या विचार करता सगळ्याच गोष्टी जगजाहीर करता येत
नसतात. आणि हे आम्हीच केले असे म्हणून उगाच कोणी डांगोराही पिटून सर्जिकल स्ट्राईक
बाबत श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये राजकारणी लोकांना राजकारण करायला फक्त मुद्दा
हवा असतो, मग ते नेते सत्ताधारी पक्षातले असोत की विरोधक. भारताची एकता अबाधित राखण्यासाठी अशा राष्ट्रीय मुद्द्याविषयी एकमेकांवर चिखलफेक केल्यापेक्षा सर्वांनी ह्या
मुद्द्यावर न बोलणेच योग्य ठरेल..! बाकी राहिला मुद्दा जनतेच्या हिताचा, तर
त्यासाठी शेतकरी आत्महत्या, दारिद्र्य निर्मुलन, पाणी टंचाई, वाढती लोकसंख्या,
बेरोजगारी ह्या मुद्द्यावर देखील बोला ना, पण मात्र अशा राष्ट्रीय मुद्द्यावर बोलून
‘आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी’ असे वागणे म्हणजे खरी गरज आहे ती तुमच्या
असल्या शंकेखोर विचार करण्याच्या प्रवृतीचे सर्जिकल करण्याचे..!.
Wednesday, 28 September 2016
कोळेगाव जि. प. शाळेस जाळ्या भेट.
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे कै. लीलाबाई
व्यायाम शाळेतर्फे कोळेगाव जिल्हा परिषद शाळेस वृक्ष संरक्षण जाळ्या भेट देण्यात
आल्या. झाडे लावा झाडे जगवा’ हे घोष वाक्य खऱ्या अर्थाने कृतीत उतरविले आहे ते
कोळेगाव येथील नवतरुण माजी सरपंच पंडितराव गावंडे यांनी. कोळेगाव येथील शाळेत
विदयार्थी संख्या वाढावी व विद्यार्थ्यांचे शिक्षणातील स्वारस्य वाढावे यासाठी
शाळेत आकर्षक रंगरंगोटी केलेली आहे. त्याच प्रमाणे शाळेच्या परिसरामध्ये वृक्षारोपण
करण्यात आले आहे. सदरील लावलेल्या झाडांना संरक्षण जाळ्या असल्यास झाडांना नुकसान
होणार नाही या कल्पनेतून आणि ज्या शाळेत आपली पाल्य शिकताहेत त्या शाळेसाठी आपलेही
काही देणे लागते या भावनेतून पंडितराव गावंडे यांनी स्वखर्चातून लोखंडी जाळ्या
शाळेस भेट दिल्या आहेत. केवळ शासकीय मदतीवर अवलंबून न राहता प्रत्येकांनी शाळेच्या
सर्वांगीण विकासासाठी शक्य होईल तेवढी मदत करावी असे आवाहन यावेळी माजी सरपंच
पंडितराव गावंडे यांनी केले आहे. यावेळी शिक्षक नागने सर, शालेय शिक्षण समितीचे
अध्यक्ष सुनील गावंडे, अंकुश गावंडे, शांताराम गावंडे, सांडू गावंडे, भाऊसाहेब
गावंडे आदींची उपस्थिती होती.
Tuesday, 13 September 2016
सत्याचा आवाज दाबला जाऊ नये.
मुंबई महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाच
लाखाची लाच मागितल्या प्रकारी ‘विनोदवीर’ कपिल शर्माने उगाच वाद ओढवून घेतला. पण
या प्रकरणाची दुसरी बाजूही लक्षात घेणे आवश्यक आहे, की पंधरा कोटी रुपये कर भरून
देखील कोणी लाच मागत असेल तर आपल्या समाजाला कीड नव्हे भयंकर रोग झाला आहे.
निर्भीडपणे नरेंद्र मोदींनाच ट्विट काल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दखल घेणे
अपेक्षितच होते पण कोणताही पुरावा नसताना एखाद्यावर आरोप करणे ही नक्कीच
अपमानास्पद बाब आहे. आपला समाज हा कलाकारांचे अनुकरण फार करतो कपिल शर्मा हा
प्रसिद्ध कलाकार असल्यामुळे त्यानेही आपण काय बोलतो कसे वागतो याचा थोडा विचार
करायला हवा आणि समजा खरेच कोणी लाच
मागितली असेल आणि संबधित अधिकाऱ्याचे नाव केवळ राजकीय दबावामुळे तो सांगत नसेल तर
ही एकप्रकारची दडपशाही ही असू शकते. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर
आल्या आहेत त्यामुळे कपिलच्या या वक्त्यव्याने राजकारण्यांना आयतेच कोलीत मिळाले
आहे. एखाद्या कामासाठी शासकीय कर्मचाऱ्याकडून लाच मागणे हा जसा गुन्हा आहे तसाच
बेकायदा बांधकाम करणे, तिवरांची झाडे तोडणे हा देखील गुन्हाच आहे पण मुंबई नगर
पालिकेने आत्ताच कापील शर्मा विरुद्ध गुन्हा दाखल करणे हे संभ्रम मिर्माण करीत
आहे. आपल्यावर जर खरोखरच अन्याय होत असेल तर आवाज उठवायलाच हवा..किंवा जर कोणी
त्याविरुद्ध आवाज उठवीत असेल तर त्याला पाठींबा तरी द्यायला हवा फक्त तो आवाज
निष्पक्ष हवा..!
Sunday, 4 September 2016
मिरचीचा 'हिरवा चिखल' न होवो.!
मागील दोन वर्षापासून मिरची ह्या पिकावर रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव असल्यामुळे परिणामी मिरचीने भावाचा नवीन उच्चांक गाठला. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे ह्या वर्षी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. आणि जे अपेक्षित होते तेच झाले. चौदा रुपये प्रति किलो विकली गेलेली मिरची आज पाच रुपये प्रती किलो या भावाने विकली जात आहे. व्यापारी वर्गाकडून एक प्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. जिवाची तम न बाळगता शेतकरी रात्रंदिन अपार कष्ट करतो तेंव्हा कुठे पीक त्याच्या हाती लागते. पण एवढे करूनही शेतकरी मार खातो ते मार्केटिंगमध्ये, सर्वच बाबतीत सरकार शेतकऱ्यांची मदत करू शकणार नाही. त्यामुळे 'ट्रेंड' बघून शेतकऱ्यांनी आपापल्या पिकांचे नियोजन केल्यास आज मिरचीची जी परिस्थिती आहे त्यासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही. अर्थ शास्त्राच्या मांगणी आणि पुरवठा हा सिद्धांतही लक्षात घेणे आवश्यक आहे. एखाद्या पिकाला जर चांगला बाजार भाव मिळत असेल तर सर्वांनीच त्याकडे वळणे योग्य ठरणार नाही कारण उत्पादन जास्त झाले कि बाजार भाव आपोआपच कमी होतात. केवळ एकाच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके शेतकऱ्यांनी घेतल्यास जेणे करूनएखाद्या शेत मालास भाव कमी मिळाल्यास दुसऱ्या पिकातून त्याची भरपाई करता येइल. याचप्रमाणे शेतमालाच्या मार्केटिंगचा अभ्यास करून पिकांचे नियोजन केल्यास याचाही शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होईल. सध्यातरी मिरचीने शेतकऱ्यांना ठसका लावला आहे, त्याचा 'हिरवा चिखल' न होवो एवढीच अपेक्षा...!
Wednesday, 31 August 2016
कोळेगाव येथे पोळा उत्साहात साजरा
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे पोळा सण शांततेत साजरा करण्यात आला. सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी बळीराजाच्या सणासाठी कुठलीही कमी भासू दिली नाही. दुपारी अंदाजे पाच वाजे दरम्यान गावाच्या वेशीजवळ वाड्या वस्त्यावरील सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या बैलांना सजवून शांततेत उभे केले. दरम्यान पोळा फुटताच वरून राजाने जोरदार हजेरी लावल्यामुळे गाववासीयांच्या आनंदला पारावर उरला नाही. गावातील युवकांनी पोळ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन करून पारंपारिक पद्धतीने गावातून बैलांची मिरवणूक काढली. पोळ्याच्या दुसऱ्या दिवसी श्री भैरवनाथ महाराज मंदिराच्या परिसरामध्ये पाडव्यानिम्मित पंचक्रोशीतील शेतकरी आपापल्या बैलांसहित मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात, याही कार्यक्रमासाठी गावकऱ्यांच्या वतीने व्यवस्था केल्यामुळे पाडव्याच्या यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Saturday, 27 August 2016
Turn toward business.
Day by day the numbers of unemployed youth are
increasing. Everyone wants to get five figure job and hence the competition of
education is getting so stressful. If job dosen’t get then youth should have to
turn to business. Lot of opportunities are waiting for you. Many student who
belongs from rural villages goes to city, joined private classes, working hard
even they failed to get job and in this situation they commit suicide. Students
or youth have to understand that only get a job is not a main aim of education.
If you fail to get job no problems try to do different. Today lot of business
opportunities available if you start small scale business then some youth also
have get job from you, dairy milk, goat farming, chickens farming, milk
processing business may option have there. These business ideas not only make
you survey in village but also may make you millionaire if you are dedicated to
your work, you have done for something for your native place this valuable
satisfaction will make you more courage.
Subscribe to:
Posts (Atom)