Saturday, 6 January 2018
Monday, 18 December 2017
'त्या' घटनेचा कोळेगाव येथे निषेध
रिसोड
तालुक्यातील कुऱ्हा मांडवा येथे जखमी अवस्थेतील माकडाला जिवंत मारल्यानंतर त्याच्या
मृतदेहास झाडावर लटकवून प्रातरणा करण्याऱ्या घटनेचा भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे
तीव्र निषेध करण्यात आला. सामाजिक माध्यमावरील एका चित्रफितीमध्ये माकडाला जखमी
करून अत्यंत निर्दयीपणे मारण्यात आल्याचे दिसत आहे. माकडाला मारणारा निर्दयी युवक
एवढ्यावरच न थांबता त्याने मृत माकडाला झाडाला उलटे टांगून खेटराने बडविल्याची
बाबही समोर आली आहे. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या आणि अत्यंत संताप निर्माण करणाऱ्या या घटनेतील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त
केले. गावातील हमुमान मंदिरामध्ये दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ७.३०
वाजता माजी सरपंच सिद्धेश्वर वाघ यांच्या हस्ते हनुमान प्रतिमेची पूजा करून मृत
माकडाच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शांताराम
गावंडे, डॉक्टर ईश्वर वाघ, दादाराव गावंडे, मधुकर गावंडे, कैलास गावंडे, ज्ञानेश्वर
गावंडे, सारंगधर पन्हाळे, अमोल गावंडे,अवचित सोनवणे, इत्यादींची उपस्थिती होती.
Wednesday, 29 November 2017
खेड्यातील अवलिया तरुण करणार एड्सवर जाणीव जागृती
१ डिसेंबर हा जागतिक एड्स विरोधी
दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. एड्स हा विषयच खूप मोठा आहे, एरवी पुण्यतिथी
जयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या करणाऱ्या या देशात एड्स रोगाविषयी खूप कमी
प्रमाणात बोलले जाते. मागील काही वर्षामध्ये एड्स रोगाविषयी तरुणांमध्ये मोठ्या
प्रमाणावर जाणीव जागृती होत आहे ही बाब आशादायक आणि स्वागताहार्य आहे. ग्रामीण
भागामाध्ये तर लैंगिक विषयावर बोलणेच अस्पृश्य ठरवले जाते त्यामुळे एड्स सारख्या
जीवघेण्या रोगाविषयी ग्रामीण नागरिकांना माहिती देणे खूपच कठीण होऊन जाते आणि हीच
बाब अधोरेखित करून भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील युवक दादाराव गावंडे पुढे
सरसावला आहे. सध्या जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत त्यामुळे व्हाट्सअप
फेसबुक, युट्यूबचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याच सामाजिक माध्यमांचा
उपयोग करून एड्स रोगाविषयी ग्रामीण युवकांमध्ये लघुपटाद्वारेमाहितीचा प्रसार
करण्याचा दादाराव गावंडे या तरुणाचा मानस आहे. युट्यूब वर “डीजीटल डीजी” आणि “रुरल टीव्ही” असे दोन चॅनल्स हा तरुण चालवत आहे. वेगवेगळ्या शासकीय योजनेसाठी अर्ज कसे करावेत यासंदर्भात व्हिडिओद्वारे नागरिकांना मार्गदर्शन
करण्याचे काम निरंतर हा तरुण करत आहे. किंवा गावामध्ये काही समस्या असेल तर त्या
संदर्भात संबधित व्यक्तीची मुलाखत घेऊन ती समस्या सर्व गावकऱ्यांच्या समोर मांडून
त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या
समाजाचे आपणासही काही देणे लागते याच भावनेतून आता एड्स रोगाविषयी १ डिसेंबर या जागतिक
एड्स विरोधी दिनाच्या दिवशी गावातीलच काही तरुणांच्या मदतीने लघुपट निर्मितीची
सुरुवात होत आहे. एड्स विषयी तरुणांच्या मनात थोडी देखील जागृती झाली तरी या लघुपटाचे
हे खूप मोठे यश असेल यात तीळमात्र शंका नाही.
Tuesday, 28 November 2017
Monday, 27 November 2017
Tuesday, 21 November 2017
झाडाच्या स्वरुपात आई जिवंत.
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव
येथे माजी सरपंच श्री पुंडलिकराव गावंडे व त्यांच्या भावंडानी वेगळा आदर्श निर्माण
केला आहे. वृद्धपकाळामुळे पुंडलिकराव गावंडे यांच्या आई श्रीमती चंद्रभागाबाई
पाटीलबा गावंडे यांचे दिनांक १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. आईचे रक्षाविसर्जन तीर्थक्षेत्रावर
न करता शेतातच खड्डा खोदून त्यामध्ये रक्षा विसर्जन करण्यात आले व त्यावर
आम्रवृक्ष लावण्यात आला आहे. झाडाच्या स्वरुपात नेहमी माझी आई जिवंत असेल अशी
भावना त्यांनी व त्यांच्या भावंडानी व्यक्त केली आहे. जलप्रदूषनाचा राक्षस
दिवसेंदिवस वाढत असतांना पुंडलिकराव गावंडे यांनी निर्माण केलेला हा आदर्श कोळेगाव
व कोळेगाव परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे. यापुढे गावातील प्रत्येक नागरिकांनी
रक्षाविसर्जन नदी नाल्यात किंवा तीर्थक्षेत्रावर न करता आपापल्या शेतात करावा व
तिथे वृक्षारोपण करून पर्यावरणास हातभार लावावा असे आवाहन पुंडलिकराव गावंडे व
कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
Subscribe to:
Posts (Atom)