Wednesday 25 May 2016

प्रत्यक्ष कृतीतून विकास शक्य.


जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यापासून पासून १८ किमी अंतरावर असलेल्या कोळेगाव ग्रामपंचायतीला पाणी टंचाई हा शब्द कायमचा वळणी पडलेला. निवडणुका आल्या की प्रत्येकजण घोषणा देतात आणि त्या घोषणाच राहतात, ह्या सर्व विचार सरणीनां फाटा दिला आहे तो येथील एका युवकाने. कोळेगाव येथील युवक गजानन गावंडे यांनी २००० लोकसंख्या असलेल्या कोळेगाव वासीयांना मोफत पाणी पुरवठा करून आदर्श निर्माण केला आहे. गावकऱ्याना कायम पाणी टंचाईचा सामना करावा लागतो, पाणी टंचाईवर खारीचा वाटा म्हणून या तरूणाने आपल्या स्वतःच्या विहिरीतील पाणी गावकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले, स्व: खर्चातून स्वतःच्या विहिरीतले पाणी पईप लाईनद्वारे शासकीय विहिरीत सोडले जात असल्यामुळे काही प्रमाणात का होईना कोळेगाव येथील गावकऱ्यांचा चेहऱ्यावर आनंदाच्या छटा उमटल्या हे नक्की. युवकांना योग्य दिशा दिली आणि नेतृत्व केले तर समाज बदलायला काहीच वेळ लागत नाही हाच संदेश गजानन पाटील गांवडे युवकांना देत असून त्याचे सकारात्मक परिमाण युवकांमध्ये निर्माण होत आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपणाला काही देणे लागते, प्रत्येकांनी कोणतेही सामाजिक कार्य करण्यासाठी स्वतः पासून सुरुवात केली तर समाजात नक्कीच बदल घडू शकतो हे त्यांनी दाखवून दिल्यामुळे गावातील नवतरुण मंडळीमध्ये कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला आहे, आणि हाच एक टर्निंग पॉइंट गावाच्या विकासाला कारणीभूत ठरू शकेल शंका नाही.

Saturday 21 May 2016

सोशल वालंटिअर्स ग्रुप तर्फे संत रोहिदास महाराजांना अभिवादन.

भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे सोशल वालंटिअर्स ग्रुप तर्फे संत रोहिदास महाराज यांना त्यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या जीवन कार्यवार थोडक्यात प्रकाश टाकण्यात आला. संत रोहिदास महाराजांनी सतत समाजहितासाठी कार्य केले, जातीधार्मापेक्षा समाजधर्म मोठा असतो हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले त्यामुळे युवकांनी त्यांचा आदर्श घेवून सामाजिक उपक्रमामध्ये हिरीरीने सहभाग घेऊन सदैव समाज सेवेसाठी कार्यतत्पर रहावे असे अवाहन सोशल वालंटिअर्स ग्रुपचे सदस्य दादाराव पाटील गावंडे यांनी केले. यावेळी सोशल वालंटिअर्स ग्रुपचे सदस्य दादाराव गावंडे, अवचीतराव सोनवणे, कौतिकराव सोनवणे, अनिल चौतमोल रमेश सोनवणे, कैलास गावंडे, शंकर गावंडे, गणेश सोनवणे, माजी पोलीस पाटील सोनाजी चौतमोल, अरुण गावंडे, रामकृष्णा म्हस्के, विकास शिंदे, राहुल साळवे आदी उपस्थित होते.

आणि मी ‘सगुणाची’ संकल्पनाच बदलली...!

 आजारांची थोडी जरी लक्षण आढळून आली तरी दवाखान्यात नेण्या अगोदर एकदा तरी सपाट भांड्यावर आदला उभा करून ‘सगुण’ पहिल्या शिवाय त्यांना काही चैन पडत नसे. एकदा मी ठरविले की आमच्या आईचा हाच दृष्टीकोन त्यांना जरा वेगळ्या भाषेत समजून सांगूया. असाच एकदा मला ताप असतांना आईने माझा सगुण बघितला. घरातील जेवणाच्या परातीच्या गुळगुळीत पृष्ठ भागावर वेगवेगळ्या देवांची नावे घेवून ती आदला उभा करण्याचा प्रयत्न करीत होती अर्थात गुडी आणण्याचा प्रयत्न करीत होती, आणि एकदाचा तो आदला उभा राहिला आणि तिचा समज झाला की माझ्यावर अमुक एका देवाची अवकृपा झाली आहे. मी तिला सांगितले की मी तुला हाच आदला कोणत्याही देवाचे नाव न घेता उभा करून दाखविला तर?? त्यावर तिच्या सोबतीने घरातील सर्वच मंडळी म्हणाली की हे शक्यच नाही, आणि मग मी घरातील सर्वांना कोणत्याही देवाचे नाव न घेता आदला त्या सपाट परतीच्या गुळगुळीत पृष्ठभागावर उभा करून दाखविला. देवाच्या नावाशिवाय आदला उभा राहूच शकत नाही या घरातील मंडळीच्या फाटा दिला आणि बऱ्याच अंशी त्यांच्या मनातील अंधश्रद्धा दूर केल्याचे मला समाधान लाभले.
श्रद्धा ही सुप्त मनाची एक भावनिक शक्ती आहे, असे म्हणतात की कोणतीही गोष्ट सात वेळेस म्हटल्यावर आठव्या वेळेस प्वाइंट झिरो झिरो का होईना पण त्या गोष्टीचा मनावर परिमाण होतो याला शास्त्रीय आधार आहे. आणि याच गोष्टीचे भांडवल करून ढोंगी साधू बाबा याचा फायदा उठवतात. श्रद्धा डोळस आणि विज्ञानवादी हवी. देवांवर श्रद्धा जरूर असावी त्याने जगण्याला प्रेरणा मिळते अंधश्रद्धा मात्र मुळीच नसावी कोणताही बदल घघडवायला थोडा वेळ आणि साहस लागते. मानवाने यशाची विविध शिखरे पादक्रांत केली असून विज्ञानाच्या जोरावर सर्वच क्षेत्रावर हुकुमत गाजवलेली असतांना अंधश्रद्धेच्या बाबतीत काही प्रमाणात याला अपवाद आहे असेच म्हणावे लागेल. खेड्यातील परिस्थिती एकवेळ आपण समजू शकतो मात्र शहरातील लोकं सुद्धा याला अपवाद नाहीत किंबहुना अंधश्रद्धेच्या बाबतीत खेड्यापेक्षा शहरातील नागरिक जास्त अंधश्रद्धेच्या प्रभावाखाली असल्याचे दिसत आहेत. घरांची वास्तूशांती असो किंवा नवीन दुकानाचे उद्घाटन आजही शुभ दिवस, तिथी पाहून त्याची सुरुवात होते. अंधश्रद्धेची पाळेमुळे लोकांच्या मनात खोलवर रुतलेली असून तिला उपटून काढण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरांपासून सुरुवात करायला हवी तेंव्हाच समाजात मोठा बदल घडविणे शक्य होईल.

Wednesday 18 May 2016

कोळेगाव येथे नाला रुंदीकरण व खोलीकरण कामाचे उद्घाटन.


भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे नाला रुंदीकरण व खोलीकरण कामाचे उद्घाटन कोळेगाव येथील प्रतिष्ठित नागरिक गजानन पाटील गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले. नाला रुंदीकरण व खोलीकरण कामामुळे सिमेंट नाला बंधाऱ्यामध्ये पावसाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी साठवून कोळेगाव येथील गावकऱ्यांना सतत भेडसावत असलेल्या पाणी टंचाईवर कायमचा तोडगा निघून बऱ्याच अंशी पाणी टंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होईल व त्याच प्रमाणे जमिनीतील पाणी पातळी वाढून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होणार असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये कमालीचा आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी माजी सरपंच पुंडलिकराव गावंडे, माजी सरपंच पंडितराव गावंडे, माजी सरपंच तेजराव पाटील गांवडे, डॉ. ईश्वर वाघ, रामचंद्र गावंडे, दिलीप गावंडे, अंकुश गावंडे, साहेबराव महाराज, गुलाबराव सुसर, बाजीराव गावंडे, आदी ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Poems

Poems

Just Step Out..!

Fear is the most obstacles in the life of human. Just step out, no matter what is situation, no matter what will people says just through yourself for what you want. Take risk and go ahead. If you hesitate for taking risk then no one can expect from you. Just look back, many leaders had nothing but they had taken risk, taken advantages of situations and made the name of him... face the problems...find out solution because tough situations gave best lessons in the life thane any teachers. confidence is the most powerful weapon of man, just sharp it. Once you do it you will able to do if forever.