रिसोड
तालुक्यातील कुऱ्हा मांडवा येथे जखमी अवस्थेतील माकडाला जिवंत मारल्यानंतर त्याच्या
मृतदेहास झाडावर लटकवून प्रातरणा करण्याऱ्या घटनेचा भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे
तीव्र निषेध करण्यात आला. सामाजिक माध्यमावरील एका चित्रफितीमध्ये माकडाला जखमी
करून अत्यंत निर्दयीपणे मारण्यात आल्याचे दिसत आहे. माकडाला मारणारा निर्दयी युवक
एवढ्यावरच न थांबता त्याने मृत माकडाला झाडाला उलटे टांगून खेटराने बडविल्याची
बाबही समोर आली आहे. अंगाचा थरकाप उडविणाऱ्या आणि अत्यंत संताप निर्माण करणाऱ्या या घटनेतील आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी असे मत यावेळी नागरिकांनी व्यक्त
केले. गावातील हमुमान मंदिरामध्ये दिनांक १९ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ७.३०
वाजता माजी सरपंच सिद्धेश्वर वाघ यांच्या हस्ते हनुमान प्रतिमेची पूजा करून मृत
माकडाच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शांताराम
गावंडे, डॉक्टर ईश्वर वाघ, दादाराव गावंडे, मधुकर गावंडे, कैलास गावंडे, ज्ञानेश्वर
गावंडे, सारंगधर पन्हाळे, अमोल गावंडे,अवचित सोनवणे, इत्यादींची उपस्थिती होती.
Monday, 18 December 2017
Wednesday, 29 November 2017
खेड्यातील अवलिया तरुण करणार एड्सवर जाणीव जागृती
१ डिसेंबर हा जागतिक एड्स विरोधी
दिन म्हणून जगभर साजरा करण्यात येतो. एड्स हा विषयच खूप मोठा आहे, एरवी पुण्यतिथी
जयंत्या मोठ्या प्रमाणात साजऱ्या करणाऱ्या या देशात एड्स रोगाविषयी खूप कमी
प्रमाणात बोलले जाते. मागील काही वर्षामध्ये एड्स रोगाविषयी तरुणांमध्ये मोठ्या
प्रमाणावर जाणीव जागृती होत आहे ही बाब आशादायक आणि स्वागताहार्य आहे. ग्रामीण
भागामाध्ये तर लैंगिक विषयावर बोलणेच अस्पृश्य ठरवले जाते त्यामुळे एड्स सारख्या
जीवघेण्या रोगाविषयी ग्रामीण नागरिकांना माहिती देणे खूपच कठीण होऊन जाते आणि हीच
बाब अधोरेखित करून भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील युवक दादाराव गावंडे पुढे
सरसावला आहे. सध्या जवळपास प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहेत त्यामुळे व्हाट्सअप
फेसबुक, युट्यूबचा वापरही मोठ्या प्रमाणात होत आहे आणि याच सामाजिक माध्यमांचा
उपयोग करून एड्स रोगाविषयी ग्रामीण युवकांमध्ये लघुपटाद्वारेमाहितीचा प्रसार
करण्याचा दादाराव गावंडे या तरुणाचा मानस आहे. युट्यूब वर “डीजीटल डीजी” आणि “रुरल टीव्ही” असे दोन चॅनल्स हा तरुण चालवत आहे. वेगवेगळ्या शासकीय योजनेसाठी अर्ज कसे करावेत यासंदर्भात व्हिडिओद्वारे नागरिकांना मार्गदर्शन
करण्याचे काम निरंतर हा तरुण करत आहे. किंवा गावामध्ये काही समस्या असेल तर त्या
संदर्भात संबधित व्यक्तीची मुलाखत घेऊन ती समस्या सर्व गावकऱ्यांच्या समोर मांडून
त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या
समाजाचे आपणासही काही देणे लागते याच भावनेतून आता एड्स रोगाविषयी १ डिसेंबर या जागतिक
एड्स विरोधी दिनाच्या दिवशी गावातीलच काही तरुणांच्या मदतीने लघुपट निर्मितीची
सुरुवात होत आहे. एड्स विषयी तरुणांच्या मनात थोडी देखील जागृती झाली तरी या लघुपटाचे
हे खूप मोठे यश असेल यात तीळमात्र शंका नाही.
Tuesday, 28 November 2017
Monday, 27 November 2017
Tuesday, 21 November 2017
झाडाच्या स्वरुपात आई जिवंत.
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव
येथे माजी सरपंच श्री पुंडलिकराव गावंडे व त्यांच्या भावंडानी वेगळा आदर्श निर्माण
केला आहे. वृद्धपकाळामुळे पुंडलिकराव गावंडे यांच्या आई श्रीमती चंद्रभागाबाई
पाटीलबा गावंडे यांचे दिनांक १७ नोव्हेंबर रोजी निधन झाले. आईचे रक्षाविसर्जन तीर्थक्षेत्रावर
न करता शेतातच खड्डा खोदून त्यामध्ये रक्षा विसर्जन करण्यात आले व त्यावर
आम्रवृक्ष लावण्यात आला आहे. झाडाच्या स्वरुपात नेहमी माझी आई जिवंत असेल अशी
भावना त्यांनी व त्यांच्या भावंडानी व्यक्त केली आहे. जलप्रदूषनाचा राक्षस
दिवसेंदिवस वाढत असतांना पुंडलिकराव गावंडे यांनी निर्माण केलेला हा आदर्श कोळेगाव
व कोळेगाव परिसरात कौतुकाचा विषय बनला आहे. यापुढे गावातील प्रत्येक नागरिकांनी
रक्षाविसर्जन नदी नाल्यात किंवा तीर्थक्षेत्रावर न करता आपापल्या शेतात करावा व
तिथे वृक्षारोपण करून पर्यावरणास हातभार लावावा असे आवाहन पुंडलिकराव गावंडे व
कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे.
Saturday, 11 November 2017
सोशल मिडीयाचा प्रभाव, मी कोळेगावकर ग्रुप तर्फे विविध उपक्रम
सोशल मिडीयाचा विकास कामासाठीसुद्धा उपयोग केला
जाऊ शकतो हे सिद्ध झाले आहे तो कोळेगाव येथे राबविलेल्या विविध उपक्रमांतून, भोकरदन तालुक्यातील कोळेगाव
येथील ‘मी कोळेगावकर’ या व्हाट्सअप ग्रुपवर कोळेगाव येथील युवक गावासंबाधित विविध विषयांवर
चर्चा करतात. मागील चर्चा ही शाळेतील
समस्यांविषयी होती. शाळेच्या विविध समस्यावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला व काय
सुधारणा करता येऊ शकतात यावर विचारमंथन करण्यात आले. यावेळी गावातीलच तरुण सचिन
सुसर यांनी शाळेतील खेळाच्या साहित्याविषयी चिंता व्यक्त केली आणि स्वतः प्रेरित
होऊन शाळेस तीन फुटबॉल भेट दिले. गावातीलच जिल्हा परिषद शिक्षक श्री देविदास
गावंडे सर यांनी गावातील होतकरू विध्यार्थ्यानाठी उन्हाळी सुट्टीमध्ये मोफत शिकवणी
देणार असल्याचे जाहीर केले. गावाची खरी शोभा ही स्वच्छता असते त्यामुळे मी
कोळेगावकर ग्रुप मधील सदस्यांनी ठरल्याप्रमाणे जिल्हा परिषद शाळा येथे साफसफाई
केली, एकंदरीत शोशल मिडीयाचा गंधही नसलेल्या गावात तरुणांनी एकी केली तर किती बदल
घडू शकतात याचे हे जिवंत उदाहरण आहे असे म्हणता येईल. मोबाईलवर केवळ मनोरंजनासाठी फिरणारी
बोटे केंव्हा विकासाची चर्चा करू लागलेत हे त्यानाही कळले नाही, कोणी कल्पना ही
केली नसतांना सोशल मिडीयावर मिळत असलेल्या तरुणांच्या प्रतिसादामुळे ग्रुपमधील
सदस्यांमध्ये कमालीचे चैतन्य संचारले आहे. केवळ निर्णय घेण्याचा अवकाश असतो की
लगेच सर्व सदस्य कामाला लागतात. मी कोळेगावकर ग्रुपचे सर्व सदस्य गाव विकासासाठी
झटत आहेत आणि त्यांना यशही मिळत आहे ही बाब नक्कीच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे
असे म्हणण्यास हरकत नाही.
Saturday, 28 October 2017
कोळेगावकरांचा 'सोशल कट्टा'
सध्या सोशल मिडियाचे युग आहे असे म्हटल्यास अतिशोयोक्ती ठरणार नाही व्हाट्सअप, फेसबुक, ट्वीटर, गुगल प्लस, युट्युब इत्यादी समाजमाध्यमांवर लोक बराच वेळ टेहळतांना दिसतात, परंतु भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील युवकांनी व्हाट्सअप या समाजमाध्यमालाच चर्चेचे व्यासपीठ बनविले आहे. दोन तीन दिवसामिळून सर्वांच्या चर्चेतून एक विषय निवडला जातो आणि त्यावर संध्याकाळी चर्चा केली जाते. ‘मी फक्त कोळेगावकर’ असे या व्हाट्सअप ग्रुपचे नाव असून सत्ताधारी ते विरोधक सार्वजन चर्चेत भाग घेतात आणि त्यावर चर्चा करतात. काही कारणास्तव बाहेरगावी असलेल्या कोळेगावकरनाही या सोशल माध्यमांवरील चर्चेमध्ये सहभागी होता येते, यामुळे गावातील समस्यावर काही प्रमाणात का होईना तोडगा काढण्याचा प्रयत्न याठिकाणी केला जातो आहे यामध्ये तिळमात्र शंका नाही. सोशल मिडियाचे नकारात्मक परिणाम डोके वर काढत असताना कोळेगावकरानी चर्चेसाठी अवलंबलेले हे मध्यम सध्या सर्व गावकऱ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल माध्यमांचा योग्य उपयोग केला तर ते शाप नसून वरदानच ठरत असल्याचे उदाहरण या ठिकाणी पहावयास मिळत आहे.
Friday, 27 October 2017
कोळेगाव येथील तरुणांनी केली साफसफाई.
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथील आंबेडकर गल्लीमध्ये असलेल्या बाबासाहेब विचारमंच परिसरामध्ये गावातील
तरुणांनी साफसफाई
करून परिसर स्वच्छ केला. स्वच्छता अभियान केवळ काही दिवसासाठी किंवा काही
महिन्यांसाठी मर्यादित नसून ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामुळे गावातील
सर्व तरुणांनी आपल्या वैयक्तिक स्वच्छते बरोबरच सार्वजनिक स्वच्छतेवरही भर दिल्यास
आपला व पर्यायाने आपल्या परिसर रोगराईमुक्त राहण्यास मदत होईल अशी चर्चा यावेळी
उपस्थित तरुणांनी केली. यावेळी दादाराव गावंडे, अवचित सोनवणे, कौतिक सोनवणे, अक्षय
शिंदे, अंकुश अवसरमोल, राहुल साळवे, रामकृष्ण म्हस्के, सुगंधाबाई खंडाळे व इतरांची
उपस्थिती होती.
Thursday, 26 October 2017
HP laptop cooling fan not working 90 b error Solution.
hello friends if you are searching solution for system fan 90 B error HP laptop cooling fan not working correctly then here is the total solution click here for HP laptop cooling fan not working 90 b error
Monday, 23 October 2017
कोळेगाव येथे टाकी बांधकामाचे उद्घाटन.
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव
येथे आंबेडकर गल्लीमध्ये पाणी साठवणुकीसाठी बऱ्याच दिवसापसुन मागणी होती ह्याची
दखल घेवून गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी सरपंच गजानन गावंडे यांच्या हस्ते पाणी
साठवणूक टाकीच्या बांधकामाचे उद्घाटन करण्यात आले. पाणी साठवणुकीसाठी होत असलेल्या
टाकी बांधकामामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. विकास काम करत असतांना कुठलाही
भेदभाव केला जाणार नाही व गाव विकासाठी राजकीय जोडे नेहमीच उंबरठ्याच्या बाहेर
ठेवून आपण सदैव विकास कामासाठी तत्पर असू असे मत यावेळी गजानन गावंडे यांनी व्यक्त
केले. यावेळी प्रल्हाद गावंडे, पांडुरंग वाघ, दादाराव गावंडे, डी. पी. गावंडे, संतोष
साळवे, मुकेश चौतमोल, अंकुश गावंडे, समाधान म्हस्के, राजू चौतमोल इत्यादींची
उपस्थिती होती.
Sunday, 1 October 2017
कोळेगाव येथे स्वच्छता अभियान
दिनांक १५ सप्टेंबर ते २
ऑक्टोबर स्वच्छता पंधरवडा राबविण्यात येत आहे यानिमित्त भोकरदन तालुक्यातील
कोळेगाव येथे रिलायन्स फाउंडेशन, जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायतच्या संयुक्त
विद्यमाने स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. गावामध्ये स्वच्छता फेरी
काढून विविध भागामध्ये साफसफाई करून तणनाशक फवारणी करण्यात आली. स्वच्छता अभियान
केवळ ठराविक काळासाठी मर्यादित नसून ही सुदृढ जीवन जगण्यासाठी अखंड चालणारी क्रिया
आहे त्यामुळे सर्वांनी आपापला परिसर स्वच्छ ठेवण्याचा कसोसीने प्रयत्न करावा असे
आवाहन रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने सचिन सुसर यांनी केले.
Thursday, 28 September 2017
How to transfer money from SBI to Gramin Bank or Rural Bank
Hello frineds, i am going to show you how to transfer 32000 rupees from SBI to other gramin Bank. today everyone have using internet banking so i think this video will surely helpful for you. please see above video or click here for money transfer guidance. Hope you will like this video and after like this video i am sure you will do not leave without hitting subscribe button.
Saturday, 23 September 2017
Free online Computer courses
Hey friends if you are looking online computer courses then here is good news for you..we are starting online guidance like MS word, MS excel, MS power point and many other essential courses. This video guidance absolutely free for all of you for video guidance you have to click here or you can visit My YouTube Channel
Thursday, 21 September 2017
How to link Aadhar card to Bank Account
friends if you don'nt have linked your Aadhar number to Bank account yet then just go for online bank and do linked right now...if you didn't know how to link then watch above video or click here for more information. if you think this video may be helpful for you then don't leave without Subscribe My YouTube Channel.
Tuesday, 19 September 2017
Make passport size photos less than 4 minutes
Here is the tricks how to make passport size photographs less than 4 minutes..just watch above video or click here for video guidance and do not forget to subscribe my youtube channel
Saturday, 16 September 2017
Follow these steps to get online Birth Certificate
hello friends if you want to get online birth certificate then watch above entire video and follow the instruction or just CLICK HERE for video guidance..after watching this video you will able to download Birth certificate, and do not forget to share this video on your facebook time line or twitter handle because your one share can help to other who are searching information like this
Monday, 11 September 2017
How to earn money from home
If you are reading this text then you are in right place. Desire to earn money ? okay let me explain what you need firstly you have to need laptop and internet connection then there is lot of opportunities are waiting for you, you have to grab it. Have you skil of data entry..good then just search https://digitizeindia.gov.in/ this website, here is the place where you got the data entry work. now question is how does it work, then please watch above video or CLICK HERE for quick guidance. for more visual guidance visit My YouTube Channel.
Sunday, 10 September 2017
Want to get online ration card? Follow this steps
ration card is so important for daily routine, for residential proof, admission in the school, passport and many other services like this, ration card is important. And oh.. getting Kerosene, grains and many other government schemes it's so important. Sound is good..! now you thing how to get it online, right! Okay, here is the tricks how to apply ration card online. watch above video or CLICK HERE for entire guidance...and please do subscribe My YouTube Channel
Government Schemes GR download or see online.
Many people deprived from benefits of government schemes due to lack of information about schemes. i am trying to help those people who want to know their rights and want to take benefits of government various schemes through video. i have made a video regarding on this issue. Some government officers did not giving entire information about government schemes to common man hence the poor's did not able to take benefits of that schemes. i am trying to help them, watch above video or CLICK HERE for information. After watching this video you will able to see online all government schemes GR or you can download it...and of course..if you liked this video then do not live without subscribe my youtube channel.
Tuesday, 5 September 2017
ONLINE INCOME CERTIFICATE
कोळेगाव येथे गणरायांना निरोप.
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव येथे शांततेत गणपती
विसर्जन करण्यात आले. गणपती स्थापने पासून ते विसर्जनापर्यंतच्या काळात गावामध्ये
धार्मिक आणि उत्साहवर्धक वातावरण असते. गणपती स्थापनेपासून ते विसर्जनापर्यंतच्या काळात
विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. यामध्ये समाज प्रबोधनपर कीर्तने, शालेय
विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा, भारुडे. भजने इत्यादींचा समावेश असतो. गणपती
विसर्जनाच्या दिवशी गावकऱ्यांच्या वतीने सामुहिक भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले
होते. गणरायाची आरती करून सजविलेल्या बैलगाडीतून गावभर मिरवणूक काढण्यात आली.
गावातील आबालवृद्धानी हिरीरीने गणरायांच्या मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदविला. विशेष
बाब म्हणजे कोळेगाव येथे डी.जे. बँडबाजा किंवा तत्सम बाबतीत नाचण्यावर मागील पंधरा
वर्षापासून पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे आणि याचे काटेकोरपणे पालन देखील होत
आहे परंतु गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, यात्रा असे सामुहिक कार्यक्रम यासाठी अपवाद
असल्यामुळे गणपती मिरवणुकीत तरुणांनी यथेच्छ नाचण्याचा आनंद लुटला. एक गाव एक
गणपती ही संकल्पना मागील दहा वर्षापासून कोळेगाव येथे राबविली जात आहे आणि
यापुढेही चालू ठेवण्याचा गावकऱ्यांच्या मानस आहे.
Tuesday, 29 August 2017
How to apply CSC new registration.
Devendra Fadnvis Government has given loan waiver to farmers
of Maharashtra but condition is that farmers should have submitted their
application through online. Now many farmers are standing in queue in front of
online centers that have also suffering from website hanging problem. In this
situation I am going to show you how to register CSC agency online. Here is
complete guide about CSC registration. If you have done successful registration
of CSC then you can able to take benefit of Maharashtra government’s schemes. click here for video guidance
Sunday, 27 August 2017
HP Pavilion Laptop
Greaat laptop introduced by HP in Pavilion series, this laptop build with 8 GB Ram, 1 TB hard disc with graphics card feature. this laptop having WiFi, blue tooth connectivity. Intel's i5 core processor giving boost for better work. 2.5 gigahertz processor speed can work fast and easy. stylish design attracting everyone, in short this laptop is best for work best for do something better. if you want to know more about this laptop then just click on it and get all information about it.
Wednesday, 23 August 2017
कोलेगाव में खूब रंग लाई कुश्ती
भोकरदन तहसील के कोलेगाव में मंगलवार को
(२२ अगस्त)हरसाल की तरह इस साल भी बैल पडवा उत्साह के साथ मनाया गया. पड़वे के दिन
जागृत संस्थान भैरवनाथ महाराज मंदिर परिसर में कुश्ती स्पर्धा का आयोजन किया जाता
है, सालोंसे चलरही यह
परंपरा इस साल भी जारी रही, कोलेगाव तथा कोलेगाव परिसर के युवकोंके कला गुणोंको बढ़ावा देना
यह इस स्पर्धा के आयोजन का मुख्य उद्देश्य है, इस स्पर्धा में बड़ी संख्या में
पहलवानोंने हिस्सा लिया विजेता को आयोजक की ओर से नगद इनाम दिए गए. गाव के
नवयुवकोंने कुश्ती स्पर्धा का सोशल मिडिया पर बखुबीसे प्रचार किया और इसका नतीजा
यह रहा की इस साल दर्श्कोंकी संख्या में भारी मात्रा में इजाफा हुआ, गाववालोंका नियोजन, सोशल मिडियापर
युवाकोंद्वारा प्रचार और लोगोका उत्साह इस कारण यह स्पर्धा सफल रही, इस स्पर्धा को सफल
बनानेके लिए भैरवनाथ संस्थांन के अध्यक्ष सांडू साहब, पुंडलिकराव गावंडे, पंडित गावंडे, डॉ. ईश्वर वाघ, गजानन पाटील गावंडे, भागवत गावंडे, रामेश्वर गावंडे, समाधान गावंडे तथा
गाववासियोंने प्रयास किए,
कोळेगाव येथे पाडवा उत्साहात साजरा.
Saturday, 12 August 2017
How to add money in Airtel Payment Bank
Hello friend, are you heard about Airtel Payment Bank, Okay then this video will help you for how to add money in your Airtel Payment Bank account. if you have not created your account in Airtel Payment Bank or you don't know how to create new account in Airtel Payment Bank then click here to watch how to create new account in Airtel payment Bank
Thursday, 10 August 2017
Saturday, 5 August 2017
Sonu tuza mazyavar bharosa nay ka.
Sonu tuza mazyavar bharosa nay ka this song is became most popular song in the maharashtra in this season. specially children's have most fan of this song. My nephews have sung this song very nicely please click here to watch full song of them.
Lotto Men's Vertigo Running Shoes
its will be a fantastic deal when you purchase this shoes form Amazon. great offer for those who believe in quality. just click here and purchase now.
Sunday, 30 July 2017
विकासाची रिबीन आणि कात्री.
सिल्लोड येथे दिनांक २९
जुलै रोजी केंद्रीय दळणवळण व भूपृष्ठ्मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते औरंगाबाद-
जळगाव रस्त्याच्या सिमेंटीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी गडकरी साहेब
म्हणाले की सदरील रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दानवे साहेबांच्या हातात कात्री
तर सत्तार साहेबांच्या हातात रिबीन असेल. किती क्रांतीकारी विचार आहेत हे. शेजारचा
चीन डुरक्या फोडतोय तर पाकिस्तान वाकुल्या दाखवतोय अशा परिस्थितीमध्ये देशामध्ये
राजकीय पातळीवरून एकात्मतेचे प्रदर्शन होणे आवश्यक आहे. कारण कार्यकर्त्यांवर
किंबहुना जनतेवर आपले लोकप्रतिनिधी कसे वागतात ह्याचा खूप मोठा परिणाम होत असतो
त्यामुळे विकास कामामध्ये खरोखरच जर राजकारणाला दूर ठेवले तर डॉ.ए.पी.जे अब्दुल
कलाम यांचे २०२० पर्यंत भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण झालेच म्हणून समजा. इंग्रजांनी
हेच केले होते फोडा आणि राज्य करा आणि पुन्हा सर्वाना एकत्र होण्यासाठी
कित्येकांचे बळी गेले कित्येक दिवस वाट बघावी लागली आणि नंतर स्वातंत्र्य मिळाले
त्यामुळे मिळालेले हे स्वातंत्र्य असेच अबाधित ठेवण्यासाठी किंबहुना देशाची प्रगती
करण्यासाठी आज सर्व राजकीय नेत्यांनी किमान विकास कार्यामध्ये तरी राजकीय जोडे
बाहेर ठेवून सकारात्मकता ठेवून सहकार्य करण्याची अपेक्षा आहेत. तरच खऱ्या अर्थाने
विकास कामांची रिबीन आपण समतेच्या कात्रीने कापू शकू यात तिळमात्र शंका नाही.
Wednesday, 21 June 2017
CM Devendra Fadnvis answered my question.
The program Mi Mukhyamantri Boltoy was organized on behalf
of Directorate General of Information and Public Relations (DGIPR). Department also appealed for send question to public regarding subject. The subject was WATER for agriculture, business. As per the news of Daily Pudhari (which was published from Mumbil) More than
18000 emails were received by department regarding this issue. The most attractable and sensetive question was ‘what
is the planning for recover of prodigious dewatering’ which is asked by me and
CM Devendra Fadnvis has given nice answer for this. Kindly watch video till the
end.
कोलेगाव् के किसान ने मुख्यमंत्री से पूछा सवाल
भोकरदन तहसील के कोलेगाव के युवक दादाराव गावंडे ने महाराष्ट्र सरकार द्वारा आयोजित कार्यक्रम "मी मुख्यमंत्री बोलतोय" में पानी के इस्तेमाल के संदर्भ में सवाल पूछा था. इस कार्यक्रम में १८००० से भी ज्यादा लोगो ने इमेल के जरिये मुख्यमंत्री को सवाल किए थे इनमे से दादाराव गावंडे का सवाल काफी परिणाम करक था, मुख्यमंत्री ने उनका अभिनंदन किया और सवाल के जवाब देते हुए कहा की जलयुक्त शिवार योजना के तहत किए जा रहे काम के जगह जलपरिपूर्णता अहवाल सादर करने के लिए जानेवाले धोरण निश्चित किया गया है| सूक्ष्मसिंचन तरीके का उपयोग और गाव द्वारा किये गये जल संतुलन के अनुसार किसनो द्वारा फ़सल का नियोजन जरुरी है| जलयुक्त शिवार योजनामें से किए जलस्वयंपूर्ण हुए गावोमें इस दृष्टीसे नियोजन किया जाएगा| ऐसा मुख्यमंत्री ने कहा|
जलयुक्तच्या पाणी उपश्याकडे गावंडेनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष.
Guest Author - Bhagwan Palkar ( Reporter daily Deshonnati Marathi newspaper)
भोकरदन तालुक्यातील कोळेगाव या छोट्याशा गावातील दादाराव गावंडेनी
विचारलेल्या प्रश्नाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून याबद्दल
त्यांचे कौतुक केले आहे.
दादाराव गावंडे हे गावाच्या बाबतीत संवेदनशील
व्यक्तिमत्व. गावाचा विकास व्हावा यासाठी सतत झटत असतात सोशल मिडीयावर सतत कार्यरत
असतात. त्यांचा स्वतःचा ब्लॉग असून युट्यूबवर आहेत. मी मुख्यमंत्री बोलतोय या
कार्यक्रमासाठी जनतेकडून प्रश्न विचारण्याचे आवाहन करण्यात आले होते. नुकत्याच पार
पडलेल्या कार्यक्रमाचा पाणी हा विषय होता. राज्यातून अठरा हजार इमेल प्राप्त झाले
होते. गावामध्ये झालेल्या जलयुक्त शिवारमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले होते.
विहिरी नाले तुडुंब भरले त्यामुळे कपाशी अठरा क्विंटलवरून पंचवीस तर गहू वीस क्विंटलवरून
अठ्ठावीस गेल्याचा अनुभव त्यांनी सांगितला.
पाणी मोठ्या प्रमाणात असले तरी उपसा त्याहीपेक्षा मोठ्या प्रमाणात होत असल्याने
लगेच पाण्याचा तुटवडा निर्माण झाला, यावर शासन काय उपाय योजना करणार असा प्रश्न
त्यांनी विचारला होता. यावर मुख्यमंत्र्यांनी चांगला प्रश्न विचारल्याबद्दल
त्यांचे अभिनंदनकरून पिक आराखड्याबद्दल व पाणी ताळेबंदाविषयीचा निर्णय शासन दोन
तीन वर्षात लागू करणार असल्याचे सांगितले.
खेडेगावातील युवकाने सोशल मिडीयाचा योग्य वापर
करून मुख्यमंत्र्यांचे लक्ष जलयुक्त शिवार योजनेचे काम झाल्यानंतर जमा होणाऱ्या
पाण्याच्या जलद उपश्याच्या प्रश्नाकडे वेधल्याने मुंबईच्या वर्तमानपत्रांनी याची
दखल आवर्जून घेतली आहे. अनेकांनी फोन करून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला
आहे.सोशल मिडिया ही केवळ शहरवासीयांची मक्तेदारी नसून ग्रामीण युवकही सकारात्मकतेने
आपले प्रश्न मांडून कल्पकता दाखवितात हे त्या निमित्ताने समोर आले आहे, यामुळे
दादाराव गावंडे यांचे तालुक्यात कौतुक होत आहे.
Tuesday, 16 May 2017
इथे ‘आत्महत्येस’ही लाईक मिळतात.
‘ढोलताशे’ या मराठी चित्रपटाचे निर्माते अतुल
तपकीर यांनी चित्रपटाचे अपयश आणि कौटुंबिक संघर्षामुळे आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी
तपकीर यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर याविषयी सविस्तर माहिती दिली. आश्चऱ्याची गोष्ट
म्हणजे ‘आणि म्हणून मी विष घेऊन आत्महत्या करत आहे’ या त्याच्या फेसबुक पोस्ट ला अनेक
मित्रांचे ‘लाईक्स’ सुद्धा मिळाले आहेत. केवढी मोठी ही शोकांतिका! यावरून आभाशी जग
खरोखर किती आभाशी आहे याची जाणीव होते. आपल्या खऱ्याखुऱ्या नात्यांना प्रसंगी
तिलांजली देऊन आभाशी दुनियाच खरी दुनिया आहे असा अनेकांचा भ्रम होत आहे. प्रत्येक
जण संध्या फेसबुक, व्हाट्सअॅप ट्विटर अशा सामाजिक माध्यमांचा वापर अगदी डोळेझाक करत आहे म्हटल्यास वावगे
ठरणार नाही. सामाजिक माध्यमावर रोज प्रचंड प्रमाणात माहितीची ढकलाढकली चालू असते
आणि यामध्ये व्हाट्सअॅप वर तर कहरच होत
आहे. कोणतीही माहिती न वाचता ती पुढे ढकलली जाते आहे. राजकीय सुडापोटी उगाच
कुणाच्या फोटोला एडिट करून वेगवेगळ्या ग्रुप्सवर फिरवले जाते आणि अशा प्रकारचा
हलगर्जीपणा एक दिवस आपल्याला धोक्यातही आणू शकतो. सामाजिक माध्यमांवर एखादी चुकीची
पोस्ट करणे जशा गुन्हा आहे तितकाच गुन्हा त्या पोस्ट ला लाईक करणे हा सुद्धा आहे. अतुल
तपकीर यांच्या पोस्ट ला लाईक करणाऱ्यांनी नक्कीच ती वाचली नसेल कारण आत्महत्या
करणाऱ्यांना कुणीच प्रोत्साहित करणार नाही. सामाजिक माध्यमांचा वापर आजच्या काळात
तरी टाळणे अशक्य असला तरी तरुणांनी त्याच्या जास्त आहारी न जाण्यातच शहाणपणा आहे. सोशल
माध्यमे ही जागतिक व्यासपीठ आहेत त्यामुळे तिथे व्यक्त होतांना भान असणे अत्यंत
आवश्यक आहे.
Friday, 20 January 2017
get rewards from Indian government by doing data entry job..
if you have laptop or computer and of course time then you should have to go for it..kindly watch my video for how to earn money
Tuesday, 17 January 2017
Speech About online Banking
i am trying to do help of people as much as possible. i was getting problem for internet banking some days before hence i sincerely want to no one have face to this problem like me.
Monday, 16 January 2017
Saturday, 14 January 2017
Subscribe to:
Posts (Atom)